Festival Posters

dev uthani ekadashi 2019 : प्रबोधिनी एकादशीला हे कामं करू नये अन्यथा आपण पापाचे भागीदार व्हाल

Webdunia
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (12:21 IST)
एकादशीला तांदुळाचे कोणत्याही रूपात सेवन करू नये. तांदूळ खाल्ल्याने मन चंचल होतं आणि प्रभू भक्तीमध्ये मन रमत नाही.
 
पौराणिक कथेनुसार देवीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी महर्षी मेधाने शरीर त्याग करून त्याचं अंश पृथ्वीत सामावलं होतं. तांदूळ आणि जवस या रूपात महर्षी मेधा उत्पन्न झाले म्हणून तांदूळ आणि जवस जीव मानले गेले आहेत.
 
एकादशीला सकाळी दातुन करणे वर्ज्य मानले गेले आहे परंतू हे शक्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही फुलं आणि पानं तोडणे वर्जित आहे.
 
एकादशीला उपास करणे शक्य नसले तरी हरकत नाही परंतू ब्रह्मचर्याचे पालन नक्कीच करावे. या दिवशी संयम बाळगणे आवश्यक आहे.
 
एकादशीला बिछान्यावर न झोपता जमिनीवर झोपावे.
 
एकादशी आणि दुसर्‍या दिवशी द्वादशीला तुळशीचे पाने तोडू नये.
 
मांस आणि मादक पदार्थाचे सेवन चुकून करू नये. तसेच अंघोळ झाल्यावरच काही ग्रहण करावे.
 
एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये याने पाप लागतं. खोटं बोल्याने मन दूषित होतं आणि दूषित भक्तीने केलेली पूजा फळत नाही. या दिवशी चुकून देखील क्रोध करू नये.
 
देवउठनी एकादशीला धान्य, डाळी, आणि बीन्स ग्रहण करणे टाळावे. 
 
या दिवशी उपास करणार्‍यांनी केवळ पाणी पिणे सर्वोत्तम ठरेल परंतू असे करणे शक्य नसल्यास फळं, दूध किंवा इतर फळाहार घेता येईल.
 
एकादशी व्रताचं मुख्य उद्देश्य शरीराच्या गरजा कमीत कमी असाव्या आणि अधिकाधिक वेळ आध्यात्मिक लक्ष्याची पूर्तीसाठी असावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya festival Special अक्षय तृतीयेला अश्या प्रकारे बनवा 'परफेक्ट' शाही आम्रस

शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते

Basweshwar Jayanti 2026 Wishes in Marathi महात्मा बसवेश्वर जयंती शुभेच्छा

शनिवारची आरती

Akshay Tritiya 2026 अक्षय तृतीया माहेरवाशिणींसाठी आहे खास; या दिवशी माहेरी येण्याचे असते विशेष आमंत्रण

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments