Vivah Panchami 2024 Date: विवाह पंचमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच साजरी केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी भगवान राम आणि देवी सीता यांचा विवाह झाला होता. म्हणून याला विवाह पंचमी म्हणतात आणि या दिवशी श्री राम आणि माता सीता यांची पूजा केली जाते. विवाह पंचमीच्या दिवशी पूजा किंवा धार्मिक विधी केल्याने वैवाहिक जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. पण या शुभ दिवशी लग्नासारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. चला जाणून घेऊया या वर्षी विवाह पंचमी कधी आहे आणि या दिवशी विवाह का होत नाहीत?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 5 डिसेंबर रोजी दुपारी 12:49 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 6 डिसेंबर रोजी रात्री 12:07 वाजता समाप्त होईल. अशात विवाहपंचमी 6 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 7 ते 10.54 पर्यंत आणि यानंतर संध्याकाळी 5:24 ते 6:06 पर्यंत असेल.
धार्मिक मान्यतेनुसार प्रभू राम आणि माता सीता यांचा विवाह मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी झाला. म्हणून याला विवाह पंचमी म्हणतात आणि हा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मंदिरांमध्ये विशेष तयारी केली जाते आणि लोक घरी विधीपूर्वक भगवान राम आणि माता सीतेची पूजा करतात. परंतु हिंदू धर्मात या दिवशी विवाह केला जात नाही. हा दिवस विवाहासाठी अशुभ मानला जातो.
भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह पंचमीच्या दिवशी झाला होता. हिंदू धर्मात राम-सीता या जोडप्याला आदर्श पती-पत्नी म्हणून पूजले जाते. प्रत्येक जोडप्याला आपले जोडपे राम-सीतेसारखे असावे असे वाटते. हे जोडपे राम आणि सीतासारखे राहावे म्हणून वडीलधारी मंडळीही त्यांना आशीर्वाद देतात. पण लग्नानंतर भगवान राम आणि माता सीता यांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला आणि त्यांचे जीवन कष्टांनी भरलेले होते. वनवास संपवून ते आपल्या राज्यात परतले नक्की पण तेव्हा देवी सीतेला अग्निपरीक्षेच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. यानंतर प्रभू रामाने माता सीता गरोदर असताना त्यांचा त्याग केला, त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने वाढवले. या सर्व घटनांमुळे विवाहपंचमीच्या दिवशी लोक आपल्या मुलींचे लग्न लावून देत नाहीत.
अस्वीकारण: ही माहिती सामान्य समजुतीवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.