Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी?

विवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी?
, गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (00:58 IST)
कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पहिले की तो विवाहित असेल किंवा नाही, हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली, की ते धारण करणारी महिला विवाहित असते, हे ज्ञान सर्वमान्य आहे. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणे नसून ते धारण करण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत. ती कारणे लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरु केल्या हे आपल्या लक्षात येईल. पायांच्या बोटांमध्ये जोडवी घालण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत.
 
आजकाल पायांच्या कुठल्याही बोटांमध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे. तर्‍हेतर्‍हेची जोडवी आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील, म्हणजेच दुसर्‍या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत. पायांच्या अंगठ्याशेजारील बोटामध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. ह्या नसेवर, पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो व त्यामुळे या नसेशी निगडित अवयवांचे कार्य सुरळीत चालते.
 
पायांध्ये ज्या बोटांध्ये जोडवी घातली जातात त्या बोटाध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. त्यामुळे पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. तसेच जोडव्यामुंळे सायटिक नर्व्हवर दबाव येऊन त्याच्या आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय, मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्राव सुरळीत राहतो.
 
पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेन्द्रियांचे कार्य सुरळीत चालत राहून मासिक धर्म नियमित होतो. तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे. चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनितली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह व स्फूर्तीता अनुभव होतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या प्रकारे भरावी देवीची ओटी, शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या