Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज गुरु पुष्यासोबत 5 शुभ योग, करू शकता हे उपाय

Webdunia
बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (17:49 IST)
आजाचा दिवस फारच खास आहे कारण या दिवशी एक नाही दोन नाही बलकी 5 शुभ योग एक साथ बनत आहे. 13 ऑगस्टला गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, लक्ष्मी योगासोबतच शुभ नावाचा योग देखील बनत आहे. पूर्ण वर्षात एवढे शुभ योग एकाच दिवशी फारच कमी बघायला मिळतात.  
 
12 ऑगस्ट, बुधवारी रात्री 10.28 मिनिटावर पुनर्वसू नक्षत्र समाप्त होताच पुष्य नक्षत्र सुरू होईल, जे पुढील दिवशी 13 ऑगस्ट रात्री 11.44 पर्यंत राहील. या प्रकारे संपूर्ण दिवस पुष्य नक्षत्र असल्यामुळे गुरु पुष्य योग बनत आहे. या दिवशी चंद्रमा व मंगळ कर्क राशीत असल्यामुळे लक्ष्मी योग बनत आहे. सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्धीच्या संयोगामुळे हा दिवस अधिक खास झाला आहे. तसेच गुरुवार व पुष्य नक्षत्राच्या योगामुळे शुभ नावाचा योग देखील बनत आहे. या प्रकारे एका दिवसात 5 शुभ योग असतील.  
 
गुरु पुष्य योगात करण्यात आलेले सोपे उपाय
1. या गुरुवारी संध्याकाळी लक्ष्मीची विधीनुसार पूजा करावी नंतर लक्ष्मीच्या चरणात सात कौड्या ठेवाव्या. अर्ध्या रात्री नंतर या कौड्यांना घरातील एखाद्या कोपर्‍यात खणून द्या. हा उपाय केल्याने धनाशी निगडित सर्व समस्या दूर होतात.  
 
2. गुरु पुष्याच्या रात्री अंघोळ करून पिवळी धोती धारण करावी आणि एका आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसावे. आता आपल्या समोर  सिद्ध लक्ष्मी यंत्राला स्थापित करावे, जे विष्णू मंत्राने सिद्ध असेल आणि स्फटिक माळेच्या खाली लिहिलेल्या मंत्राचे 21 माळेचा जप करावा.  मंत्र जप करताना मध्ये उठायचे नाही, मग साक्षात लक्ष्मी देखील तुमच्यासमोत आली तरी चालेल.   
मंत्र- ऊं श्रीं ह्रीं श्रीं ऐं ह्रीं श्रीं फट्
या उपायाला विधिपूर्वक संपन्न केल्याने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन जाते.  
 
3. जुने चांदीचे नाणे आणि रुपयांसोबत कौडी ठेवून त्याची केशर आणि हळदीने पूजा करावी. पूजेनंतर त्यांना तिजोरीत ठेवावे. या उपायामुळे तुमच्या तिजोरीत बरकत कायम राहील.  
 
4. गुरु पुष्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी कार्य आटपून लक्ष्मी मंदिरात जायला पाहिजे आणि देवीला कमळाचे फूल अर्पित करून पांढर्‍या रंगाच्या मिठाईचा प्रसाद द्यावा. लक्ष्मीसमोर धन संबंधी अडचणींना दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. काही दिवसांत तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल.  
 
5. गुरु पुष्याला दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून विष्णूचे अभिषेक करावे. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.  
 
6. गुरुवारी संध्याकाळी घरातील ईशान्य कोपर्‍यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा. वात कापसाची न लावता लाल रंगाच्या दोर्‍याची लावावी, तसेच दिव्यात थोडे केशर घालावे. हा प्रयोग केल्याने लवकरच धन प्राप्ती होते.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments