suvichar

घनश्याम

सौ. कमल जोशी

Webdunia
ND
मनाच्या कणाखरपणासाठी मंत्राचा जप औषध आहे.

जर सारे जग निरनिराळ्या रंगांच्या मागे धावत आहे तर भगवंताने हे घनश्याम रूप का घेतले? याचा विचार करतर असे वाटते की हृदयातील काळे काळे मेघ अती उज्जवळ रूपावरून ओवाळून टाकावेत इतके सुंदर आहेत. ग्रीष्म ऋतूच्या अतिभयंकर उष्णतेने धरती तापत होती. जमिनीत पेरलेले बी भाजून निघत होते. आटलेल्या नद्या दु:खाने निश्वास टाकीत होत्या. अन्नपाण्याशिवाय आम्ही कसे जगू ह्या काळजीने सृष्टीवरील प्रत्येक प्राणी आकाशाकडे लक्ष लावून बसला होता. त्याच वेळी सप्तरंगी अलंकार ल्यायलेल्या मेघाला दया आली. तो धावत धावत सागरा पाशी गेला, ज्याप्रमाणे जगताच्या कल्याणार्थ शिवाने विष प्राशन केले. त्याप्रमाणे मेघ समुद्राचे खारे पाणी पिऊ लागला. त्यामुळे त्या सप्तरंगी मेघाचा रंग काळाशार झाला त्याने समुद्रातील मीठ स्वत:जवळ ठेवले व निर्मल पाण्याचा वर्षाव पृथ्वीवर केला. हे पाहून भगवंताने विचार केला की मलाही अशा मंगल कार्याकरता पृथ्वीवर अवतार घ्यायला हवा. मला माझे अवतार कार्य लक्षात राहावे म्हणून मी असेच घनश्यामरूप धारण करीन. धन्य आहे भगवंत.

( श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी
सर्व पहा

नवीन

Budh Stotra लक्ष्य साध्य करण्यासाठी बुध स्तोत्र पाठ

आरती बुधवारची

Varuthini Ekadashi 2026 वरुथिनी एकादशी व्रत कधी? जाणून घ्या अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Gajkesari Yog On Akshaya Tritya अक्षय तृतीयेला गजकेसरी योग, या ३ राशींसाठी प्रचंड आनंदाचा क्षण

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

Show comments