कोणत्याही देवाला भक्ताकडून धन, वैभव किंवा पंचपक्वान्नाच्या नैवेद्याची गरज नसते, त्याला तर फक्त ओढ असते भक्तीची. भक्तीच्या भुकेला देवाला दोन हस्तक व तिसरं मस्तक एवढेच लागतं. म्हणून देवपूजेत अवडंबर नसावा. मग कशी करावी देवपूजा जाणून घ्या...
* मंत्राद्वारे देवपूजा केली पाहिजे पण ते मंत्र येत नसतील तर शक्य नसेल तर षोडशोपचारे पूजा करावी.
* देव्हार्यात भंग, जीर्ण मुरत्या किंवा फोटो ठेवू नये. * पूजा करताना मनापासून श्रद्धा असावी. ज्याला यात रस नाही त्याने पूजा करणार्यांना अडवू नये. * शारीरिक स्वच्छता आणि शांत चित्त ठेवून देवपूजा करावी.
* देवाला स्नान घालून हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, उदबत्ती, दीप, फूल, नैवेद्य यशाशक्ती अर्पण करावे.