suvichar

प्राचीन हिंदू धर्म

वेबदुनिया
हिंदू धर्म जगातील सर्वांत जुन्या धर्मांपेकी एक आहे. ख्रिश्चन व मुस्लिम धर्मानंतर या धर्माचे अनुयायी जगात सर्वाधिक
म्हणजे जवळपास 100 कोटींहून अधिक आहेत. भारत व नेपाळमध्ये प्रामुख्याने हिंदू रहातात.

हिंदू धर्मात वेद, उपनिषद व पुराण यांना महत्त्व आहे. या ग्रंथात या धर्माबद्दल खूप काही लिहिले आहे. मात्र, हिंदू धर्माविषयी एकसंध असे कुठेच ‍लिहिलेले नाही. वेदांमध्ये हिंदू धर्मातील देवी देवतांबद्दल लिहिलेले सापडते.

उपनिषदांत गुरूशिष्य, आत्म ा मृत्यूनंतरचे जीवन, देवाची पूजा, जन्ममृत्यू चक्र याविषयी लिहिलेले आहे.
हिंदू धर्माच्या मते 'देव एकच आहे मात्र, त्याची रूपे वेगवेगळी आहे‍त'. सिंधू नदीकाठी (सध्याच्या पाकिस्तानमधे) केलेल्या उत्खननात हिंदू धर्माविषयी बरीच माहिती मिळाली.

त्यावरून ही संस्कृती बरीच जुनी आहे, याबाबीवरही प्रकाश पडला. इसवी सन पूर्व 1700 मध्ये आर्य लोक भारतात आले. ते देवाची पूजा करत. त्यांना प्रसन्न करण्यासाठी मंत्र म्हणत.

हिंदू शब्द पारशी भाषेतून आला. ‍ते लोक सिंधू नदीला हिंदू म्हणत. त्यापलिकडे राहणारयांनाही ते हिंदू म्हणत. हिंदू धर्माचा कोणीही संस्थापक नाही. कोणतेही मुख्य पीठ नाही. हिंदू धर्मात असे मानले जाते, की जो सजीव आहे त्याच्यात आत्मा आहे.

त्यालाच मोक्ष मिळू शकतो. आत्मा अमर आहे. तो फक्त शरीर बदलतो. पुढे कामानुसार हिंदूंमध्ये चार जाती पडल्या. जे देवाची पूजाअर्चा करतात, त्यांना ब्राम्हण म्हटले जाऊ लागले.

जनतेचे रक्षण करणारे, त्यासाठी लढणारे ते ‍‍क्षत्रिय, व्यवसाय करणारे वैश्य तर इतर कामे करणारे क्षूद्र अशा जाती पडल्या. काळ पुढे गेला तशा जाती वाढत गेल्या. सुरवातीला जाती कर्मानुसार ठरत. नंतर त्या जन्मानुसार ठरू लागल्या.

हिंदू धर्मात जीवनाचे चार टप्पे ( आश्रम) आहेत. पहिला टप्पा म्हणजे ब्रम्हचर्य (विवाह पूर्व काळ) गृहस्थाश्रम (विवाहानंतरचा काळ), वानप्रस्थाश्रम (अध्यात्म) व शेवटी संन्यासाश्रम. बुध्द, जैन व शीख हे धर्म हिंदू धर्मातूनच उगम पावले.

हिंदू धर्मात खूप सण साजरे केले जातात. त्यातील दसरा- दिवाळी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, गुढी पाडवा हे महत्वाचे आहेत. चैत्र शुद्ध पाडव्यापासून हिंदू नववर्ष चालू होते.
सर्व पहा

नवीन

हनुमानजींकडून या गोष्टी शिका, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी हिरवे मूग दान केल्याने कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

Show comments