suvichar

मराठीत उखाणे

वेबदुनिया
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
..... झाली आज माझी गृहमंत्री !!!!!

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती !!!!!

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!

बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!

दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!
सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

गंगा सप्तमी 2026: तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Parshuram Jayanti 2026 Wishes in Marathi परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

Basaveshwar Jayanti 2026 महात्मा बसवेश्वर: ८०० वर्षांपूर्वी 'लोकशाही' मांडणारा क्रांतीसुर्य!

Vinayak Chaturthi 2026 विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

Show comments