Festival Posters

शिवशंभोचा जागर

Webdunia
भगवान शंकराच्या त्रिशुलावरील एका अग्रावर काशी नगरी वसली आहे. पुराणातील आख्यायिकेतही असे सांगितले आहे की, '' पूर्ण विश्व जलमय झाले तरी काशी क्षेत्राचा नाश होणार नाही.''

NDND
भारतात शंकराचे जे वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. त्यात श्रावण महिन्याचे महत्त्व जास्त आहे. चार सोमवार, एक प्रदोष तसेच सर्वांत महत्वाची अशी महाशिवरात्र याच महिन्यात येते. त्यामुळेच श्रावणाला जास्त पुण्य मिळवून देणारा महिना असे संबोधण्यात येते. या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिली जाते.

पहिल्या सोमवारी शंकराला तांदळाची मूठ, दुसर्‍या सोमवारी पांढरे तीळ, तिसर्‍याला मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि जर पाचवा सोमवार असला तर त्या दिवशी सातू एक मूठ वाहिली जाते.

NDND
महिला ह्याच महिन्यात जास्तीत जास्त पूजा अर्चा करण्यात गुंतलेल्या असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्‍यासाठी त्या देवाची भक्ती करतात. सगळ्या व्रतात सोळा सोमवारचे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. या व्रताची सुरवात वैशाख, श्रावण, कार्तिक किंवा माघ महिन्याच्या कोणत्याही सोमवारी करता येते. ह्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी म्हणजे सतराव्या सोमवारी सोळा मेहुणांना (दांपत्यांना) जेवण घालून तसेच कुठलीही वस्तू दान दिली जाते.

NDND
शंकराच्या पूजेत बेलाच्या पानाला फार मान आहे. शंकराने विषप्राशन केल्यामुळे त्याच्या शरीराची होणारी आग शमवण्यासाठी भक्तगण त्याला अभिषेक करतात. शंकराने आपल्या मस्तकावर गंगेला स्थान दिले आहे. मारुतीला शंकराचा अकरावा अवतार मानतात. पूर्ण महिनाभर शिवभक्त शिवपुराण, शिवालीलामृत, शिवकवच, शिवचालिसा, शिव पंचाक्षर मंत्र, शिव पंचाक्षर स्त्रोत, महामृत्यूंजय मंत्राचा जप तसेच रुद्र व महिम्नाची आवर्तने करतात. श्रावण महिन्यातील ह्या आवर्तनांनी विशेष लाभ होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

NDND
'' त्र्यैलोक्यातील सात द्विपांपैकी पृथ्वी एक पवित्र क्षेत्र आहे. पृथ्वीवरील महत्वाचे धरणीतीर्थ (पवित्र भूमी) आहे. भारतात भगवान शंकराची बारा ज्योर्तिलिंगे आहेत. शिवपुराणात ह्या ज्योर्तिलिंगाचा उल्लेख आहे. ज्योर्तिलिंगाच्या दर्शनाने पूर्ण त्र्यैलोक्य दर्शनाचे फळ मिळते असे म्हणतात. आकाश ज्याचे लिंग, पृथ्वी ज्याची पाठ, असा तो भगवंत येथेच वास करतो. पद्‍म पुराणाच्या पाताल खंडाच्या आठव्या अध्यायात म्हटले आहे की, जो माणूस ह्या बारा ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतो त्याच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होतातच पण स्वर्ग आणि मोक्ष यासारख्या दुर्लभ गोष्टीही त्याला मिळतात.''

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

Ganga Dussehra 2026 Wishes in Marathi गंगा दशहरा शुभेच्छा संदेश

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा