Marathi Biodata Maker

सृष्टीची भाषा

Webdunia
बुधवार, 8 जुलै 2015 (14:18 IST)
बर्‍याच वर्षानी झाडाचा पेरू तोडून खाण्याचा योग आला. सारेच हिरवे.! नेमका निवडावा तरी कोणता? एक खूणगाठ होती मनात. पाखरांनी उष्टा केलेला पेरू गोड असतो. जे पेरू सहज हाताला येत होते, ते निरखत पारखत राहिलो. कोणत्यातरी पाखराने चोच मारून चव चाखलेला, सालीच्या थराला शुभ्र थरापर्यंत छोटासा खड्डा पडलेला एक पेरू दिसला.
 
केवळ योगक्षेम चालविण्यासाठी भागवलेली पाखराची भूक ती.! असून असून कितीशी असणार? पाखरांची भूक माणसांच्या अनेक भुकांएवढी महाभयानक कशी असेल.? आपले पोट भरले की त्या इवल्या जिवाने आकाशात मोठय़ा आनंदाने भरार्‍या मारल्या असतील. पोटाची भूक भागली की इतरांना केवळ आनंद देण्याचे सुकार्य करणे हा पाखरांचा खरा धर्म असतो. व्यवहारी जगात बावरल्या आणि घाबरल्या नजरेने वावरत पोट भरणारे ते जीव मुक्त आनंदासाठी मात्र आकाशात विहरत असतात. आकाशी शुभ्र, निर्मळ निरभ्रतेशिवाय अन्य काही नसते. 
 
कधी आकाश झाकोळून जाते. तेही सार्‍या सृष्टीला अभ्यंगस्नान घालण्यासाठी. आकाशाच्या रोजच्या राती काळ्या होतात तेही मुळी इतरांना नक्षत्रांचे लुकलुकते प्रकाशझुंबर दाखवण्यासाठी. म्हणूनच पाखरांचे अन् आकाशाचे घनगर्भ मैत्र असावे, नाही का? ऋषिमुनींनी आपल्या तपस्वी विचारात पाखरांना मानाचे स्थान दिले आहे ते याचकरिता असावे. 

आनंदाची निर्मोही देवाणघेवाण करणारी पाखरे म्हणूनच त्यांनी ईश्वरस्वरूप मानली असावीत. काही क्षण तो पेरू मन भरून पाहिला. तोडूच वाटेना. पुन्हा याच डहाळीवर ते पाखरू उतरले आणि हा त्याने चाखून-माखून ठेवलेला पेरू त्याला दिसलाच नाही तर त्याला काय वाटेल? ही भावना मनाला चाटून गेली. पण उत्सुकता होती ती चवीची. मला माहिती असलेल्या गोष्टीची परीक्षा करण्यासाठी तो पेरू मनाविरूद्धच बुद्धीने तोडायला लावला. गडद हिरव्या रंगाचा तो कच्चा पेरू निश्चितच गोड असणार, ही अटकळ बांधून पेरू तोडला. त्याचबरोबर जाणीवपूर्वक सर्व बाजूंनी ठाकठीक असलेले वरून छान दिसणारे दोनतीन पेरू न विसरता तोडले. सर्वात आधी वरून चांगले दिसणार्‍या पेरूची एकेक फोड चाखून पाहिली. अगदीच तुरट आंबट होते ते पेरू.! शेवटी तो पाखरांनी उष्टा केलेल्या त्या पेरूची चव चाखली. अहाहा! पेरूची फोड लागते गोड.! याचा सुखद अनुभव मिळाला.
 
पाखरांना बाहेरून कसे कळत असावे? की हा पेरू गोड आहे. पाखरांना फळातील गोडीचा वास येत असावा का? सहवासाने एकमेकांत असलेली गोडी कळावी यासारखे भाग्य ते कोणते? देवाने जागा देईल तेथे इमानेइतबारे फुलणार्‍या, फळणार्‍या त्या पेरूच्या झाडाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. झाडाच्या बुंध्याला छान मिठी मारली. बुंधाही किती सुहृदय! अवघ्या दोन-तीन फु टांवरच त्याला फांद्या फुटलेल्या. कोणीही याच फांद्यावर पाय देऊन वरती चढावे. त्याने फुलवलेली फळे चाखावीत.
 
एका मऊशार फांदीचा मुका घेतला. बालपणी मी ज्या पेरूच्या झाडाशी बोलायचो, त्या झाडाचा हा दूरस्थ वस्ती केलेला सोयराच होता ना. त्याला विचारलं, तू कधी आपल्या सोयर्‍या-धायर्‍यांशी बोलतो का रे? तुमची एकमेकांशी बोलण्याची मातृभाषा काय असते रे? तुम्ही एकाच जागी राहून सगेसोयर्‍यांशी आसपासच्या चिंचा, लिंबांशी कसे बोलता.? त्या झाडाने उत्तर दिले, सृष्टीची मातृभाषा एकच असते रे. त्या भाषेचे नाव ‘परोपकार.’ त्याने पुन्हा प्रश्न विचारला, तुला कळते ही भाषा? मन वेडावून वेडावून गेले. 

दीपक कलढोणे 
सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Show comments