Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष

holashtak 2020
Webdunia
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (16:59 IST)
होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. या दरम्यान शुभ कार्य केल्यास समस्यांना सामोरा जावं लागतं. 
 
फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत होलाष्टक दोष राहील. या दरम्यान विवाह, नवीन निर्माण आणि नवीन कार्य आरंभ करु नये. या दिवसांमध्ये सुरु केलेल्या कार्यांमुळे कष्ट, अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 
 
होलाष्टक म्हणजे
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलाष्टकाची सुरुवात होते. होलाष्टक शब्द होळी आणि अष्टक या दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. याचा अर्थ होळीचे आठ दिवस. होलाष्टक फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथी पासून सुरु होऊन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पोर्णिमे पर्यंत असतं.
 
अष्टमी तिथीपासून सुरु होत असल्यामुळे देखील याला होलाष्टक असे म्हटलं जातं. आम्हाला होळी येण्याची पूर्व सूचना होलाष्टकने मिळते. या दिवसापासूनच होळी उत्सवसोबतच होलिका दहनाची तयारी सुरु होते.
 
या दरम्यान उग्र असतात ग्रह
होलाष्टक दरम्यान अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू उग्र स्वभावात असतात. हे ग्रह उग्र असल्यामुळे मनुष्याच्या निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. ज्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्यांच्या कुंडलीत नीच राशीचा चंद्र आणि वृश्चिक राशीचे जातक किंवा चंद्र सहाव्या किंवा आठव्या भावात आहेत. त्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असते. होलाष्टक सुरु झाल्यावर प्राचीन काळात होलिका दहन होणार्‍या जागेवर शेण आणि गंगाजल व इतर सामुग्रीने सारवण्यात येतं. तसेच तेथे होलिकेचा दंडा लावण्यात येतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्तात्रय गुरु तुम्हीच ना!

मांगीर बाबा कोण होते?

बायबलमधील मौल्यवान वचने Best Bible Quotes in Marathi

Akshaya Tritiya 2025 Esaay अक्षय तृतीया निबंध मराठी

मृत्यूनंतर मुंडन विधी का केला जातो? धार्मिक आणि आध्यात्मिक कारण जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments