Marathi Biodata Maker

होळीच्या रंगांवरून जाणून घ्या समोरच्याचा स्वभाव....

Webdunia
रविवार, 1 मार्च 2020 (09:22 IST)
होळी हा रंगांचा सण आहे. रंग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक नवी आशा नवा उत्साह भरतात. या रंगाच्यामागे बरेच काही दडलेले आहे. रंगाने आपण आप आपसातल्या वैर वैमनस्य विसरून एक होतो. रंग प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद भरतात. प्रत्येकाला कोणता न कोणता रंग प्रिय असतो. चला मग आपण याच रंगावरून आपला स्वभाव जाणून घ्यू या...  
 
1  पांढरा रंग - 
ज्यांना पांढरा रंग आवडतो त्यांचा स्वभाव सरळ, दयाळू, निःस्वार्थी, साधा भोळा आणि मानवी गुणाने संपन्न असतो. दुसऱ्यांना मदत करणे, कणखर आवाज, उंची, दृढता, आत्मविश्वास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असते.
 
2  काळा रंग - 
काळा रंग आवडणाऱ्यांचा स्वभाव नैराश्य वृत्तीचा, स्वभावात तीक्ष्ण, आकर्षक व्यक्तिमत्त्व, सौंदर्यवान, कुशल आणि आत्मविश्वासी असा असतो. असे लोक वरून अत्यंत कठोर दिसणारे पण प्रेमळ मनाचे असतात. ह्यांचा डोळ्यातून सौंदर्यता दिसते. त्यांचा त्यांच्या जोडीदारांवर चांगलेच प्रभुत्व असते. हे लोक फार काटकसरी असतात.   
 
3 नारंगी रंग -
नारंगी रंग आवडणारी व्यक्ती प्रेमळ, मैत्रीपूर्ण व्यवहार, स्वभावाने आनंदी असते. सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात दक्ष असतात. स्वभावाने मृदुल, व्यावहारिक, अष्टपैलू, चपळ, सौंदर्यवान, तेजस्वी, मृदुभाषी, असतात. 
 
4 गुलाबी रंग -
व्यवहारात आणि वागण्यात तटस्थ, स्वभावाने चंचल पण सभ्यतापूर्ण व्यवहार, आकर्षक व्यक्तित्व, चेहरा आकर्षक, नेहमीच हसमुख, शिष्टाचारी स्वभावामुळे सर्वांचे लाडके असतात. 
 
5 राखाडी रंग -
या रंगाला पसंत करणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व शांत, कार्यक्षम, कष्टकरी, स्वयंरोजगारी असतात. संधी मिळाल्यास आपल्या प्रतिभेचा भरपूर आणि चांगला वापर करू शकतात. सुपीक मेंदूचे असतात. व्यवसायात उत्तम कारकीर्दी करणाऱ्या, गर्विष्ठ, स्वभावाने कठोर असतात.
 
6 लाल रंग -
लाल रंग पसंती दाखवणाऱ्याचा स्वभाव कधी-कधी आनंदी, कधी-कधी उग्र, ठळक, धैर्यवान असतो. भविष्याची काळजी ते कधीच करत नाही. आजच्या प्रत्येक क्षणाला आनंदी बनवून जगण्याचा गुण ह्यांचा मध्ये असतो. नशिबावर जास्त निर्भर राहण्यापेक्षा कर्मावर ह्यांचा विश्वास असतो आणि आपल्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
 
7 तपकिरी रंग -
तपकिरी रंग आवडणाऱ्यांचा स्वभाव प्रशासकीय, अनौपचारिक आणि नियमित जीवन जगणे आवडणारा असतो. साज -सज्जा, पर्यटनाची विशेष आवड असते. मनात जरी दुःख असते तरी ओठांवर स्मितहास्य नेहमीच असते. जीवन कसे जगावे ह्यांच्या कडूनच शिकावे.
 
8 हिरवा रंग -
हिरवा रंग आवडणाऱ्यांचा स्वभाव कल्पनेत विचार करणारे, आपल्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाणारे, संभाषणात पटाईत, विनोदी, निसर्गाचे व्यसन असणारे असते. हे लोक चपळ आणि चतुर असतात.  
 
9 जांभळा  रंग-
जांभळा रंग आवडणारे वैयक्तिक महत्त्वाकांक्षी नसतात. वैभव विलासितेचे जीवन जगण्याची ह्यांना फार आवड असते. ह्यांचा जोडीदार त्यांना आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी दिवस रात्र धडपड करीत असतो.
 
10 पिवळा रंग-
पिवळा रंग आवडणाऱ्याचा स्वभाव रहस्यमयी असतो. कुठला क्षणी त्या आनंदित तर दुसऱ्या क्षणी त्यांना नैराश्य येतं. यांचा आपल्या स्वभावांवर नियंत्रण नसतो. दुसऱ्यानं बद्दल यांना सहानुभूती, आपुलकी असते. वाईट विचारांपासून हे लांब असतात. आपल्या मनात खूप काही साठवून ठेवतात. कोणालाही त्यांच्या दुःखाचे कारणा माहीत करणे सोपे नसतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

Hanuman 108 Names : मंगळवारी मारुतीचे १०८ नावांचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

लग्नाची संपूर्ण विधी एका क्लिक वर

इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी गुप्त नवरात्री दरम्यान हे 5 खात्रीशीर उपाय करा, प्रत्येक अडथळा दूर होईल

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments