Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होलिका दहन कथा Holika Dahan Katha

Webdunia
हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वत:ला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता.
 
पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला. 
 
सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली " दादा, मला तुझा त्रास बघवत नाही.मला अग्नी देवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही.मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही पण तो जाळून खाक होईल."
 
हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात नि वाळलेल्या कात्क्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली. व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंधीत होती. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.
 
तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

मंगळवारचे उपास कधी पासून सुरु करावे जाणून घ्या

गोविन्ददामोदरस्तोत्रम्

विष्णुपादादिकेशान्तस्तोत्रम्

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments