Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेते मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूचं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर

Webdunia
रविवार, 17 डिसेंबर 2023 (10:10 IST)
'फ्रेंड्स' या लोकप्रिय सिरीजमधलं 'चँडलर' हे पात्र साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचं 28 ऑक्टोबर 2023 रोजी निधन झालं.मॅथ्यू पेरी यांच्या निधनाच्या वृत्तान जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता मॅथ्यू पेरी यांच्या निधनामागचं कारण समोर आलं आहे. त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूमागचं नेमकं कारण समजलं आहे.
 
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मॅथ्यू पेरी यांचं निधन केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे झालं होतं. ऑक्टोबर महिन्यात मॅथ्यू पेरी त्यांच्या राहत्या घरातील स्विमिंग पूलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. बुडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं याआधी म्हटलं होतं. पण आता पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं आहे.
 
'फ्रेंड्स' या मालिकेमध्ये न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या सहा तरुण मित्रांची ही कथा होती. साल 1994 ते 2004 इतक्या दीर्घकाळ ही मालिका प्रसारित झाली. त्याचा शेवटचा भाग अमेरिकेमध्ये 52.5 दशलक्ष लोकांनी पाहिला, ज्यामुळे तो 2000 च्या दशकातील सर्वात जास्त पाहिलेला टीव्ही शो बनला.
 
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मॅथ्यू पेरी पेनकिलर आणि अल्कोहोलच्या व्यसनाशी झुंज देत होते आणि त्यांनी नशा मुक्ती केंद्रात उपचार घेतले.
 
2016 मध्ये त्यांनी बीबीसी रेडिओ-2 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'फ्रेंड्स'चं सुरुवातीचं तीन वर्षांचं चित्रीकरण त्यांना आठवत नाही, याचं कारण म्हणजे ते दारू आणि ड्रग्सच्या आहारी गेले होते.
 
54-वर्षीय मॅथ्यू पेरी यांच्या निधनाच्या जवळपास सात आठवड्यांनंतर त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट समोर आला आहे.
 
प्रेस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 'वरिष्ठ उप-वैद्यकीय परीक्षक रफी जॅबौरियन यांनी लिहिलं, त्यांनी असं म्हटलंय की मॅथ्यूच्या शरीरात केटामाइन उच्च प्रमाणात आढळलं होतं. केटामाइन हे सर्वसाधारणपणे सर्जिकल केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य ॲनेस्थेशियासाठी संबंधित आहे. केटामाइनच्या उच्च प्रमाणामुळे मॅथ्यूच्या हृदयाचे ठोके वाढले आणि तो बेशुद्ध झाला होता. त्यामुळेच पूलच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.'
28 ऑक्टोबर रोजी मॅथ्यू पेरी हे त्यांच्या राहत्या घरी पुलमध्ये प्रतिसाद देत नसल्याच्या स्थितीत आढळून आले आणि आरोग्यसेवकांना घटनास्थळी बोलावलं असता त्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
 
एका दिवसानंतर, वैद्यकीय परीक्षकांच्या कार्यालयानं त्यांची फाईल अद्ययावत केली आणि सांगतिलं की त्यांच्या केसबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, याचा अर्थ सामान्यतः असा होतो की शवविच्छेदन पूर्ण झालं आहे, परंतु अधिक तपशील आवश्यक आहे.
 
मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूनंतरच्या त्यांच्या सहकारी मित्र कलाकारांनी पेरी यांना श्रद्धांजली वाहिली. 'फ्रेंड्स'मध्ये रेचेलची भूमिका साकरणारी अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन यांनी लिहिलं की, "आमच्या मॅटीला निरोप देणं ही भावनांची अशी एक लाट आहे, जी मी यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती."
 
ज्यांनी मालिकेत रॉसची भूमिका केली होती ते डेव्हिड श्विमर म्हणतात, "अविश्वसनीय असा 10 वर्ष सुरु असलेला हास्याचा आवाज आणि कल्पकतेसाठी पेरीचे आभार"
 
एका खाजगी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असं अमेरिकन मीडियानं नोव्हेंबरमध्ये सांगितलं.
 
मॅथ्यू पेरी यांचा जन्म 1969 मध्ये मॅसेच्युसेट्स इथे झाला. ते कॅनडामधील ओटावा शहरात मोठे झाले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांचे वर्गमित्र होते.
 
तरुण असतानाच ते लॉस एंजिलिसला गेले.
 
'Boys will be boys' या सीरिजमध्ये त्यांनी चॅझ रसेलची भूमिका केली. तसंच, 'Growing pains' या सीरिजमध्येही त्याने अभिनय केला.
 
मात्र, फ्रेंड्स या सीरिजने त्यांना प्रसिद्धीच्या परमोच्च शिखरावर नेलं. जेनिफर अ‍ॅनिस्टन, कोर्टनी कॉक्स, डेविड श्विमर, मॅट लब्लांक आणि लिसा कुड्रो हे त्यांचे सहकलाकार होते. या सीरिजमध्ये त्यांच्या चँडलर बिंगचं विनोदी पात्र रंगवलं होतकं.
 
मॅथ्यू पेरी यांनी 'Fools Rush in', 'Almost heroes' आणि 'Whole nine yeards' या चित्रपटातही काम केलं होतं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

कांटा लगा या गाण्यासाठी शेफाली जरीवालाला इतके पैसे मिळाले

पुढील लेख
Show comments