आर्गो
PR |
झिरो डार्क थर्टी
अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक चित्रपट याविषयावर बनले. कॅथरिन बिगेलोचा 'झिरो डार्क थर्टी' हा चित्रपट हल्ल्यानंतर लादेनची स्थिती काय झाली हे दर्शवणारा आहे. सीआयए एजंट असलेली माया अल्-कायदाचा म्होरक्या असलेल्या लादेनला कोणत्याही परिस्थितीत शोधण्याचा विडा उचलते. पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये त्याचा छडा लागताच दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या घरावर हल्ला केला जातो. त्या रात्री काय काय घडले याचे चित्रट यात आहे. मायाच्या भूमिकेत जेसिका चॅस्टियन हीन तगडा अभिनय केला आहे.
PR |
लिंकन
अमेरिकेनेच सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या आयुष्यातील शेवटच्या चार महिन्यांवर आधारित असा हा चित्रपट. हा एक बॉयोपिक चित्रपट असून त्यात लिंकन सिव्हील वॉरच्या आधी असलेली गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ताणतणावाच्या दृश्यांनी भरलेल्या या चित्रपटात लिंकनच्या भूमिकेत डॅनियल डे लेव्हीस यांनी जान ओतली आहे.
PR |
लेस मिझरेबल्स
हा एक ब्रिटिश म्युझिकल ड्रामा आहे. तो व्हिक्यर ह्युगोच्या 1862 मधील एका फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे. आदर्श, प्रेम, ममता आणि त्याग यांची कहानी यात आहे. मोठे सेट्स आणि सुंदर पोशाख हे या चित्रपटाचे वैशिष्टय. रॉक ऑपेरा शैलीत एक हृदयस्पर्शी कहानी यामधून सांगण्यात आली आहे. ह्यू जॅकमनने या चित्रपटासाठी आपले वजन आधी पंधरा पौंडाने कमी केले व नंतर 30 पौंडाने वाढवले.
PR |
लाईफ ऑफ पाय
या मार्टल यांच्या 2001मधईल 'लाईफ ऑफ पाय' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. पाय आपल्या मातापित्यांबरोबर पाँडेचेरी राहतो व त्याचे कुटुंब कॅनडात स्थलांतर करण्याचे ठरतवे. जहाजातून त्यांनी सफर सुरू होते आणि एका भयानक वादळात त्याचे कुटुंब नष्ट होते. लाईफबोटीवर केवळ पाय आणि एक वाघ राहतो. पाय अनेक मार्गाने स्वत:चे वाघापासून संरक्षण करतो. थ्रीडी तंत्रज्ञानाने यात स्पेशल इफेक्टस अधिकच चांगले झाले आहेत.
PR |
सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबूग
मॅथ्यू क्विक याचा याच नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट. मेंटल इन्स्टिट्यूशनमध्ये काही काळ घालवल्यानंतर पेट सोलिटानो आपल्या घरी परततो आणि घटस्फोटित पत्नीशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी त्याची भेय एका रहस्यमयी तरुणी टिफनीशी होते. जिच्या स्वत:च्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढतात.
PR |
अमोर
हा एक फ्रेंच चित्रपट आहे. 'अमोर' या फ्रेंच शब्दाचा अर्थ 'प्रेम' असा आहे. या चित्रपटात एका वृद्ध दांपत्याचे प्रेम चित्रीत करण्यात आले आहे. जॉर्ज आणि अॅनीचे वय ऐंशीच्या वर आहे. दोघे निवृत्त संगीत शिक्षक आहेत. त्यांची एक कन्या आहे जी आपल्या कुटुंबासह विदेशात राहते. आपल्या आजारी पत्नीची काळजी घेणार्या पतीचे व दोघांमधील भावसंबंधाचे चित्रण या चित्रपटात आहे.PR |
बीस्ट ऑफ सदर्न वाईल्ड
PR |
जेंगो अनचेन्ड
यामधील कहानी अमेरिकेतील स्विहील वॉरच्या आधीची आहे. एक क्रूर गुलाम बाऊंटी हंटर डॉ. किंगच्या समोर येऊन उभा ठाकतो. किंगचे आपल्या भावांबरोबर भांडण आहे. जर जांगो आपल्या भावांना जिवंत अथवा मृत पकडून आणल्यास आपण त्याला गुलामगिरीतून मुक्त करू असे किंग सांगतो.
PR |