Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिकी माऊस झाला ८५ वर्षांचा !

वेबदुनिया
WD
आपला बालपणीचा दोस्त मिकी माऊस मंगळवारी ८५ वर्षाचा झाला आहे. वॉल्ट डिस्ने यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या अजरामर व्यंगचित्राने जगभरातील प्रत्येकाचे मन जिंकले. मंगळवारी त्याचा ८५ वाढदिवसही डिस्नेवल्र्डसह जगभर साजरा केला जात आहे.

गेली ८५ वर्षे आबालवृद्धांचे मनोरंजन करणा-या मिकी माऊसचा जन्म १८ नोव्हेंबर १९२८ या दिवशी झाला. वॉल्ट डिस्ने हे नाव या मिकी माऊसमुळे खरं तर सर्वतोमुखी झालं असं म्हटले तर वावगं होणार नाही. वॉल्ट डिस्ने चित्रं काढत असताना त्यांच्या स्टुडिओत बागडणा-या एका छोट्याशा उंदराला पाहून डिस्ने यांना मिकी माऊसची कल्पना सुचली.

मिकी माऊसच्या जन्मापूर्वी वॉल्ट डिस्ने ओस्वाल्ड, द लकी रॅबिट नावाची कार्टून स्टिड्ढप काढत असे. पण या नावाचे हक्क एका चित्रपट वितरकाकडे असल्यामुळे डिस्नेला नवा नायक शोधणे भाग होते. ते याच विचारात न्यूयॉर्कहून हॉलिवूडला जाण्यासाठी टड्ढेनमध्ये बसला. तेव्हा त्यांना त्यांच्या स्टुडिओमध्ये बागडणारा उंदीर आठवला. त्यांनी हॉलिवूडला पोहोचताच त्या उंदराच्या कार्टून स्टिड्ढप तयार केल्या. त्यांनी या उंदराला मॉर्टिमर माऊस असे नाव प्रथम दिले, या नावाला खट्याळपणा शोभणार नाही, असं पत्नीने डिस्नेंना सुनावले. तेव्हा मग या उंदराचं नाव मिकी ठेवले. १८ नोव्हेंबर हा जरी मिकीचा अधिकृत जन्मदिन असला तरी तो बोलपटातल्या मिकी माऊसचा आहे. त्याआधी मूकपटात त्यानं मॉर्टिमर या नावानं काम केले. त्या मूकपटाचं नाव प्लेन के्रझी असे होते. स्टीम बोट विली हा मिकी माऊसचा पहिला बोलपट १८ नोव्हेंबर १९२८ या दिवशी प्रदर्शित झाला. वॉल्ट डिस्नेचा आवाज आणि वॉल्ट यांच्याबरोबर उब आयवेक्र्सचा कुंचला यांनी मिकीस जन्म दिला. १९३५ साली मिकीला इंटरनॅशनल सिम्बॉल ऑफ गुडविल म्हणून गौरविण्यात आले.

१९३० पर्यंत मिकी वॉल्ट डिस्नेच्या १०० हून अधिक व्यंगचित्रपटांतून झळकला होता. मिकीने बघता बघता हॉलीवूड चित्रपटांच्या बरोबरीने कार्टूनपटाचा रसिक वर्ग निर्माण केला. याबरोबरच कार्टूनपटातून बाहेर पडून मिकीचे अस्तित्व आज जगभरातील विविध करमणूक पार्कमधूनही झळकते आहे. मिकीचे मुखवटे लहान मुलांचे खास आकर्षण बनले आहेत.
फ्लोरिडातील ऑरलँडो येथे उभारण्यात डिस्ने वल्र्ड उभारण्यात आले. तेथे वॉल्ट डिस्ने हातात मिकीचा हात असलेला पुतळा उभारून मिकी माऊसला ही अजरामर करण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

Show comments