Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई - मुलीस बेदम मारहाण

Webdunia
सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (17:55 IST)
पुणे येथे महिला आणि तिच्या मुलीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुणे येथील सोसायटीतील दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे 20 वर्षीय तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे ज्या पुरुषाने हे केलय तो रिकामटेकडा असून त्यांची पत्नी आय ए एस ऑफिसर आहे. हा  मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
तरुणी सेजल श्रॉफ आणि आरोपी मिलिंद काळे कोथरुडच्या उच्चभ्रू महात्मा सोसायटीत राहतात. सेजल श्रॉफ आणि तिच्या आईने रस्त्यावरील कुत्र्यांच्या 3 पिल्लांना घरात आश्रय दिला होता. मात्र शेजारी राहणाऱ्या मिलिंद काळेंना या कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होत होता.
 
त्यामुळे  कुत्र्यांची पिल्ले घेऊन जाण्यासाठी मिलिंद काळेंनी महापालिकेची श्वानपथकाची गाडी बोलावली मात्र पण ही पिल्ले दोन महिन्यांची असल्याने कायदेशीररीत्या त्यांना घेऊन जाता येणार नाही असे म्हणत  सेजल आणि तिच्या आईने विरोध केला.
 
त्यामुळे चिडलेल्या मिलिंद काळेंनी सेजल आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत सेजलचा दात पडला. यानंतर सेजलने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद काळेंविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काळेला अटक केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

सर्व पहा

नवीन

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर पुण्यातील बार आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments