Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द, अमेरिकेचा दणका

Webdunia
सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:07 IST)
पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची (सुमारे 2130 कोटी) आर्थिक मदत रद्द केली आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर १५ दिवसातच अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला हा दुसरा धक्का आहे. या आधाही अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी 500 मिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द केली होती.
 
अमेरिकेकडून पाकिस्तानला ही आर्थिक मदत कोएलिशन सपोर्ट फंडसाठी देण्यात येणार होती. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारले होते. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अफगाणिस्तानमध्ये लढत आहोत आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. अमेरिकेची अशी फसवणूक सहन करणार नाही, असे बजावत त्यांनी पाकिस्तानची आर्थिक मदत रद्द केली होती. अजूनही पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.  पाकिस्तानला मदत केल्यास तो पैसा दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही मदत रद्द करण्यात येत असल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: धुळे येथे गुरुद्वाराच्या सिंहासनावरून रक्तरंजित संघर्ष, दगडफेकीत दोघे जखमी, अश्रूधुराचा मारा

धुळे येथे गुरुद्वाराच्या सिंहासनावरून रक्तरंजित संघर्ष, दगडफेकीत दोघे जखमी, अश्रूधुराचा मारा

प्रेयसीवर कमेंट केल्यानंतर तरुणाची हत्या, चार जखमी, एका अल्पवयीन मुलासह ५ आरोपींना अटक

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावर विरोधकांचा हल्लाबोल

1कोटी घ्या, जागा सोडा... धुळ्यात भाजपकडून शिंदे सेनेला उमेदवारीची ऑफर, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments