Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुर्कीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश,6 जवानांचा मृत्यु

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (20:20 IST)
तुर्कीमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. आज, सोमवार, 9 डिसेंबर, तुर्कीच्या इस्पार्टा प्रांतातील केसिबोरलू जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. 

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरला हा अपघात झाला तेव्हा ते लष्कराच्या प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. यावेळी ते हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकले, त्यामुळे ते क्रॅश झाले. मात्र, दुसऱ्या हेलिकॉप्टरचे लँडिंग यशस्वी झाले. अपघातानंतर हेलिकॉप्टर आगीचा गोळा बनून जळू लागला.

तुर्कियेच्या इस्पार्टा प्रांतातील केसिबोर्लू जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याने सहा सैनिकांचा मृत्यू झाला. या अपघातात 5 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. दोन हेलिकॉप्टरची टक्कर कशामुळे झाली आणि एक हेलिकॉप्टर कसे कोसळले, तर दुसरे सुखरूप कसे उतरले याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

तुर्कीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश,6 जवानांचा मृत्यु

LIVE: मरकटवाडीनंतर आणखी एका गावात ईव्हीएमवर बहिष्कार

बीडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू

तनिषा-अश्विनीने गुवाहाटी बॅडमिंटन स्पर्धेत मास्टर्सचे विजेतेपद कायम राखले

Russia-Ukraine War :सीरियातील धक्क्यानंतर रशिया आता युक्रेनवर करारासाठी तयार

पुढील लेख
Show comments