Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पेनच्या बार्सिलोनात दहशतवादी हल्ला; 13 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:14 IST)
स्पेनच्या बार्सिलोनामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. एक व्हॅनने पदपथावरील काही लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हॅनच्या धडकेत अनेकजण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्पॅनिश पोलिसांनी एका ट्‌विटच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली आहे. स्पेनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेचा एक फोटो प्रसिद्ध केला असून त्यामध्ये तीन जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसत आहे.
 
बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडले. हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. याशिवाय जवळचे मेट्रो आणि रेल्वे स्थानक बंद करण्याच्या सूचना देखील केली आहेत. एल पायस वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकांना चिरडल्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments