द क्षिण अफगाणिस्तानमधील बॅंकेजवळ झालेल्या बॉंम्ब हल्ल्यात 20 लोक मृत्यूमुखी तर 50 जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारकडून देण्यात आली आहे. एका कारमध्ये हा बॉंम्ब ठेवण्यात आला होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास न्यू काबूल बॅंकेच्या प्रवेशद्वार समोर हा बॉंम्बस्फोट झाला. यावेळी बॅंकेतील कामासाठी अनेक जण लाईनमध्ये उभे होते. या लाईनजवळच हा स्फोट झाला. यामध्ये 20 जण जागीच जळून खाक झाले आहेत. तर 50 जण जखमी झाले आहेत अशी माहिती अफगाणिस्तान पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. दरम्यान तालिबानीकडून हा हल्ला झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.