Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

California plane crash:कॅलिफोर्नियामध्ये दोन विमाने हवेत धडकली

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (10:26 IST)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात गुरुवारी दोन छोटी विमाने हवेत धडकली. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला. ट्विन इंजिन असलेले सेसना 340 विमान विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना ही धडक झाली.  स्थानिक विमानतळावर दोन विमाने उतरत असताना वॉटसनविले शहरात ही घटना घडली. स्थानिक अधिकार्‍यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. 
 
वॉटसनविले विमानतळाजवळ झालेल्या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी दोन्ही खासगी छोटी विमाने विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात होती. फेडरल एव्हिएशन एजन्सी (FAA) च्या म्हणण्यानुसार यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अपघाताची चौकशी करत आहे. 
<

Multiple agencies responded to Watsonville Municipal Airport after 2 planes attempting to land collided. We have reports of multiple fatalities.

Report came in at 2:56pm.

Investigation is underway, updates to follow. pic.twitter.com/pltHIAyw5p

— City of Watsonville (@WatsonvilleCity) August 18, 2022 >
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताची माहिती आणि व्हिडिओनुसार, विमानतळाच्या आजूबाजूच्या जमिनीत दोन छोट्या विमानांचा ढिगारा दिसत आहे. एका फोटोत विमानतळाजवळील रस्त्यावरून धुराचे लोट उठताना दिसत होते. विमानतळावर असलेल्या गोदामासारख्या बांधकामातही विमान शिरताना दिसले. 
 

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments