car hits people in christmas market : जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कारने गर्दीवर धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघाताने घटनास्थळी खळबळ उडाली. जखमींना उपचारासाठी मॅग्डेबर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अनियंत्रित कार बाजारात येणाऱ्या लोकांच्या गर्दीत घुसली, असे सांगण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्था असतानाही गाडी लोकांच्या गर्दीत कशी घुसली हे कळू शकले नाही. अपघातानंतर ख्रिसमस मार्केट बंद करण्यात आले आहे.
— RadioGenoa (@RadioGenoa) December 20, 2024
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्ट्झ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही मॅग्डेबर्ग घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री रेनर हेझलेफ यांनी ख्रिसमसच्या काही दिवसांनंतर घडलेली ही घटना भयानक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही हल्लेखोराला अटक केली आहे. तो सौदी अरेबियाचा असून 2006 पासून जर्मनीत राहतो