Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना : चीनचे लोक म्हणताहेत, 'आमचं आयुष्य किड्यामुंग्यांसारखं झालंय'

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (15:20 IST)
कोव्हिडच्या लाटेने चीनमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. तेथील रुग्णालयात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
 
मायकेल रायन यांनी सांगितलं की ICU मध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र अधिकारी सातत्याने ही संख्या कमी असल्याचं सांगत आहेत.
 
बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी चीनमध्ये कोरोनाने एकही रुग्ण दगावलेला नाही. मात्र सत्य परिस्थितीतबद्दल अजूनही शंका आहेत.
 
गेल्या काही दिवसात बीजिंग आणि इतर शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
 
2020 नंतर चीन ने झिरो कोव्हिड पॉलिसी राबवली आहे.
 
मात्र दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या निदर्रशनानंतर चीनने बरेच निर्बंध उठवले आहेत.
 
त्यानंतर रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: वयोवृद्ध लोकांना आणि इतर व्याधी असलेल्यांन हा धोका जास्त आहे.
 
रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी आकडेवारीनुसार मंगळवारी पाच आणि सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे अध्यक्ष डॉ. रायन यांनी चीनला योग्य ती आकडेवारी जाहीर करण्याची विनंती केली आहे.
 
ते म्हणाले, “चीन मध्ये ICU मध्ये असलेल्या रुग्णांची संख्या कमी असल्याचं प्रशासन सांगत असलं तरी ICU मध्ये अनेक रुग्ण दाखल होत आहेत.”
 
“आम्ही गेले अनेक आठवडे हेच सांगतोय की या व्हायरसला रोखणं कठीण जाणार आहे. फक्त सार्वजनिक आरोग्य आणि इतर उपाययोजनांनी काहीही होणार नाही,” ते पुढे म्हणाले.
 
जिनिव्हामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसिस म्हणाले की चीनच्या परिस्थितीची त्यांन फार काळजी वाटतेय.
 
त्यांनी चीनला लाटेची तीव्रता, दाखल होणारे रुग्ण आणि आयसीयूमधील परिस्थिती याची माहिती देण्यास सांगितलं आहे.
 
लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचंही ते पुढे म्हणाले.
 
चीनने जी लस विकसित केली आहे, त्याचा प्रभाव इतर लशींच्या तुलनेत अतिशय कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
 
‘आमचं जगणं कीड्या मुंग्यांसारखं झालं आहे’
चीनने अचानक निर्बंध उठवल्याने कोव्हिडची पुन्हा मोठी लाट आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
रॅपिड टेस्टच्या किट्सचा सध्या तुटवडा असल्याने झिजियांग आणि अन्हुई प्रांतात एक नवीन धोरण राबवण्यात आलं आहे.
 
त्यानुसार सौम्य लक्षणं असल्यास किंवा लक्षणं नसलेला कोरोना असल्यास कामावर येण्यास परवानगी दिली आहे.
 
चीनमध्ये ट्विटर सारखं माध्यम असलेल्या Weibo वर ही घोषणा तीन कोटी लोकांनी वाचली आहे. त्याविरोधात लोकांचा संताप उफाळून आला आहे.
 
“गेल्या तीन वर्षांत काहीही तयारी केलेली नाही आणि अचानक सगळे निर्बंध उठवण्यात आले आणि आजारी असतानाही कामावर पाठवण्याचा घाट घातला जात आहे. आमचं आयुष्य किड्यामुंग्यासारखं झालं आहे," अशी कमेंट एक युजरने केली आहे. त्या कमेंटला 200 लाईक्स मिळाले.
 
“गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असून कामावर जाणाऱ्या लोकांना अटक व्हायची,” या कमेंटला 1000 लाईक मिळाले.
 
हॉटेलमध्ये क्वारंनटाईन होण्याचा काळ कमी झाल्यावर अनेक लोक चीनला परतले. मात्र ज्या वेगाने व्हायरस पसरतोय, ते पाहून ही लोक आश्चर्यचकित झालेत.
 
“मी बाहेरच्या देशात असताना मला कोरोना झाला नाही, मी इथे आलो आणि मला कोरोना झाला. माझ्या ओळखीच्या सर्व लोकांना ताप आला आहे किंवा कोव्हिड झाला. त्यामुळे बाहेरच्या देशात राहत असाल तर परत येऊ नका,” असं एका युझरने सोशल मीडियावर लिहिलं आहे.
 
गेल्या दोन आठवड्यापासून चीनमधील सोशल मीडियावर लोक कोरोनाच्या अनुभवांबद्दल भरभरून लिहित आहेत.
 
कोरोनाच्या संदर्भातील अनेक व्हीडिओही व्हायरल होत आहेत..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत मोठी बातमी,अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं

LIVE: 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार

5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार,PM मोदीही उपस्थित राहणार

LPG Price Hike: गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ,आजचे दर जाणून घ्या

तेलंगणात पोलिसांना मोठे यश, चकमकीत सात माओवादी ठार

पुढील लेख
Show comments