सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गाय हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वित्झर्लंडचा असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये एक गाय हवेत उडताना दिसत आहे.
एअरलिफ्ट दरम्यान आकाशात उडणाऱ्या या गायीने इंटरनेटवर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ स्वित्झर्लंडचा आहे. ज्यामध्ये गाय अत्यंत शांततेत राईडचा आनंद घेताना दिसत आहे. या काळात ती धडपडत नाही किंवा अस्वस्थ दिसत नाही. मात्र, गायीच्या या एअरलिफ्टिंगमागील कारण भावनिक आहे. गायीला उपचारासाठी एअरलिफ्ट करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 6, 2024
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
या व्हिडिओमध्ये एक गाय हवेत उडताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. गायीला अशा प्रकारे आकाशात उडताना पाहून सोशल मीडिया यूजर्सही विविध प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 27 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
अनेकवेळा डोंगरात अडकलेल्या गायींचे प्राण वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय जखमी गुरांना उपचारासाठी नेण्यासाठीही अनेकवेळा या मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.