Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दाऊदाचा विश्वासू अब्दुल रौफला भारतात आणणार!

Webdunia
ढाका- टी सीरिजचे मालक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार अब्दुल रौफलला लवकरच भारतात आणले जाणार आहे. सध्या बांग्लादेशमध्ये असलेल्या अब्दुल रौफल ला भारताकडे सो‍पवण्याची तयारी बांग्लादेश सरकारने दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अब्दुल रौफल 2009 मध्ये बांग्लादेशमध्ये अटक करण्यात आली होती. येथे अवैधरित्या घुसखोरी करणे आणि बनावट पासपोर्टप्रकरणी रौफला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीचा काही काळ रौफला गाजीपूरमधील काशिमपूर तुरुंगात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला ढाकामधील तुरुंगात हलवण्यात आले होते. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्याने रौफला ढाकातील तुरुंगातून सोडण्यात आले आहे. रौफला भारताच्या ताब्यात देण्यास बांग्लादेश सरकार राजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments