Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोनाल्ड ट्रंपः 2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

Donald Trump    2024 presidential election  Declaration of candidacy  Donald Trump
Webdunia
बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (13:19 IST)
अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे नेते डोनाल्ड ट्रंप यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षांतर्गत निवडणुकीकरिता आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्ष सुरुवातीला आपल्यामधून एका उमेदवाराची निवड करत असतात.
 
ट्रंप यांच्या वरील घोषणेचा अर्थ असा की ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक लढवणार आहेत.
 
फ्लोरिडाच्या मार-ए-लोगो रेसॉर्ट याठिकाणी आपली सभा घेण्यापूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला.
 
सभेत सहभागी झालेल्या लोकांना संबोधित करताना ते म्हणाले, "अमेरिकेला पुन्हा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी आज मी माझ्या उमेदवारीची घोषणा करत आहे."
 
"ते पुढे म्हणाले, "आतापासून ते 2024 च्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत मी यापूर्वी कधीही लढलो नाही, त्या पद्धतीने लढणार आहे. आपण कट्टरवादी डावे डेमोक्रेटिक्सना हरवू. ते देशाला आतून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत."
 
डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावर FBI चे छापे, संतापलेले ट्रंप म्हणतात...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानावर एफबीआयनं छापे मारले आहेत. स्वतः ट्रंप यांनी ही माहिती दिली आहे.
 
ट्रंप यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाम बीचवरील त्यांच्या घरातला बराचसा भाग एफबीआयनं आपल्या ताब्यात घेतला आहे.
 
बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी वृत्तसंस्था सीबीएस न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष असताना ट्रंप यांनी सरकारी दस्ताऐवज ज्यापद्धतीने हाताळले, त्याच्या तपासणीसंदर्भात हे छापे मारले आहेत.
 
गेल्या वर्षी अमेरिकेत कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी एक संसदीय समिती ट्रंप यांची चौकशी करत आहेत.
 
सीएनएनच्या एका बातमीनुसार, सोमवारी (8 ऑगस्ट) जेव्हा ट्रंप यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानी एफबीआयने छापे मारले तेव्हा ते स्वतः न्यूयॉर्कमधल्या ट्रंप टॉवरमध्ये होते.
 
या छाप्यांसंदर्भात ट्रंप यांनी जे निवेदन प्रसिद्ध केलं आहे, त्यात सुरूवातीलाच 'आपल्या देशासाठी हा कठीण काळ' असल्याचं म्हटलं आहे.
 
ट्रंप यांनी म्हटलं, "मी सर्व सरकारी यंत्रणांसोबत तपासामध्ये सहकार्य केलं आहे. अशावेळी माझ्या घरी अघोषित छापेमारी करण्याला काही अर्थ नाही. हे छापे ज्यापद्धतीने घालण्यात आले आहेत, त्यात अनेक त्रुटी आहेत. न्यायव्यवस्थेवरही नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून मी 2024ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाही."
 
ट्रंप यांनी पुढे म्हटलं की, अशापद्धतीच्या कारवाईमुळे अमेरिका तिसऱ्या जगातील देशांच्या पंगतीत बसू शकतो. अमेरिकाही इतर भ्रष्ट देशांप्रमाणे झाला आहे, हे दुःखद आहे. अमेरिकेची अशी प्रतिमा याआधी कधीच नव्हती
 
हे छापे अमेरिकेतील नॅशनल अर्काईव्हज रेकॉर्डसंबंधित असल्याचं सीबीएस न्यूजनंही स्पष्ट केलं आहे.
 
नॅशनल अर्काईव्हज ही एक सरकारी संस्था आहे. ही संस्था राष्ट्राध्यक्षांशी संबंधित सर्व दस्ताऐवज सुरक्षित ठेवते. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने सरकारी दस्ताऐवजांच्या हाताळणीसंदर्भात ट्रंप यांच्या चौकशीचा आदेश दिला होता.
 
नियमाप्रमाणे अमेरिकेच्या सर्व राष्ट्राध्यक्षांना सर्व पत्र, कामाशी संबंधित कागदपत्रं आणि ईमेल्स नॅशनल अर्काईव्हजकडे हस्तांतरित करायचे असतात. मात्र ट्रंप यांनी अनेक कागदपत्रं नष्ट केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
नॅशनल अर्काईव्हजनं म्हटलं आहे की, काही कागदपत्रं पुन्हा हस्तगत करण्यात आली आहेत.
 
अर्थात ट्रंप यांनी सरकारी कागदपत्रांसोबत छेडछाड केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या असून त्यात काही तथ्य नसल्याचंही म्हटलं आहे.
 
ट्रंप यांचे एका वरिष्ठ सल्लागारांनी सीबीएसशी बोलताना म्हटलं की, फेडरल एजन्सीची रेड ही राष्ट्राध्यक्षांच्या रेकॉर्डशी संबंधित होती. पाम बीचवरील या सल्लागाराने आपलं नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफबीआयने या छाप्यांसाठी जास्त वेळ घेतला नाही.
 
न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हबेर्मन यांनी त्यांच्या आगामी पुस्तकामध्ये लिहिलं आहे की, व्हाइट हाऊसच्या स्टाफला कधी कधी एका शौचालयात कागदांचा गठ्ठा मिळायचा, ज्यामुळे पाइप ब्लॉक व्हायचे. ही कागदपत्रं ट्रंप फ्लश करायचे असा कयास होता.
 
शौचालयात नष्ट केलेल्या कागदपत्रांचे फोटोही हाबेर्मन यांच्याकडे आहेत.
 
ट्रंप यांच्या घरावरील छाप्यांसंदर्भात त्यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसल्याची माहिती व्हाइट हाउसच्या सीनिअर अधिकाऱ्यांनी सीबीएसला म्हटलं आहे.
 
व्हाइट हाउसमधील एक वरिष्ठ अधिकारी, ज्यांना या मुद्दयावर सार्वजनिकरित्या बोलण्याचा अधिकार नाहीये, त्यांनी व्हाइट हाउसला या छाप्यांबद्दल कोणती माहिती नसल्याचं सांगितलं.
 
व्हाइट हाउसनं याप्रकरणी जस्टिस डिपार्टमेंटशी बोलणं झालं असल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी कोणीही राजकीय दबावाची चर्चा करू नये यासाठी ही चर्चा झाली आहे.
 
जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत म्हटलं होतं की, ते जस्टिस डिपार्टमेंटपासून अंतर ठेवून राहतील.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याबद्दल जैन समुदाय संतप्त, बीएमसीच्या हुकूमशाहीवर संतप्त लोक उद्या भव्य रॅली काढणार

LIVE: मुंबईतील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याबद्दल जैन समुदाय संतप्त

राज ठाकरेंचे वर्तन तालिबानीसारखे...एफआयआर दाखल होणार! हिंदी भाषा सक्तीच्या वादावर गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

पतीला उंदीर मारण्याचे विष दिले, पत्नीने प्रियकराला घरी बोलावून मृतदेह लटकवला फासावर

वधूच्या कृत्याने हैराण झालेल्या आयकर अधिकारी नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली

पुढील लेख
Show comments