Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाची आत्महत्या

क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाची आत्महत्या
अमेरिकेला ज्या क्युबा मधील  क्रांतिकारी फिडेल  कॅस्ट्रो  ने कधी थारा दिला नाही त्यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो डियाज बालार्ट यांनी  सकाळी आत्महत्या केली आहे. यात  क्यूबा येथील  मीडियाच्या वृत्तानुसार, डियाज गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या तो आत्त्महत्या केली तेव्हा  68 वर्षांचे होते.

यात प्रमुख म्हणजे  डियाज हा त्याच्या हुबेहूब वडील  फिडेल   कॅस्ट्रो  यांच्या  सारखा दिसत असे त्यामुळे  त्यांना 'फिडेलिटो' बोललं जात असे. जेव्हा डियाज डिप्रेशनमध्ये गेले तेव्हा  त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार  सुरू होते, मात्र त्याचाही काही विशेष परिणाम न झाल्याने ते काही महिन्यांपासून राहत्या घरीच नैराश्येवर उपचार घेत होते. मात्र कोणतही परिणाम दिसून आला नाही.  फिडेल कॅस्ट्रो  हे क्यूबाचे मोठे क्रांतिकारी नेते होते. त्यांचं निधन 26 नोव्हेंबर 2016 साली वयाच्या 90 व्या वर्षी झाल आहे. कॅस्ट्रो हे क्यूबातील अमेरिकेचं समर्थन असलेल्या फुल्गेंकियो बतिस्ताच्या हुकूशाहीला मुळासकट बाहेर करून सत्तेत आले. त्यानंतर ते क्यूबाचे पंतप्रधान झाले. आता अमेरिकेला विरोध करेल असे कोणी राहिले नसून अमेरिकेचा प्रभाव क्युबा येथे दिसेल असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरावती: नियोजन करत भाडेकरूने केला घरमालकिणीचा खून