Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाझा : 4 वर्षांच्या चिमुरड्याला पेनकिलरअभावी जोक सांगून दुखणं विसरवण्याचा प्रयत्न

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2023 (20:57 IST)
"आई कुठे आहे? आजी कुठे आहे? सगळे कुठे आहेत?"अंगावर बॉम्ब हल्ल्याच्या गंभीर जखमा असलेल्या ओमर या चार वर्षांच्या मुलानं गाझा येथील रुग्णालयात हा प्रश्न विचारला.
 
हा प्रश्न ऐकून उमरचे एकमेव जिवंत नातेवाईक मोइन अबू रेझक म्हणाले, "त्याने जेव्हा त्याच्या कुटुंबाबद्दल विचारलं तेव्हा मी उत्तर देऊ शकलो नाही. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि लहान मुलांसारखं काहीतरी बोलून प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला."
 
गाझाच्या अल-अक्सा रुग्णालयात दाखल असलेल्या उमरची प्रकृती चिंताजनक आहे.
 
डॉक्टरांना उमरचा डावा हात कापावा लागला. उमरच्या उजव्या पायावर अजूनही जखम आहे.
 
चेहऱ्यावर आणि छातीवर जखमा आहेत. उमरच्या जबड्याला दुखापत झाली असून त्याच्या शरीरावर अनेक पट्ट्या बांधल्या आहेत.
 
इस्रायली हल्ल्यात उमरला या जखमा झाल्या आहेत. ज्यात उमरच्या कुटुंबातील 35 जणांना जीव गमवावा लागलाय. उमरची आई, वडील आणि आजी यांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.
 
उमर त्याच्या कुटुंबाची वाट पाहत आहे
उमरचे नातेवाईक मोइन यांनी ठरवलं आहे की, या मुलाची प्रकृती बिघडू नये म्हणून या मृत्यूबाबत काहीही सांगू नये.
 
सध्या इजिप्तच्या माध्यमातून उमरला गाझामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
असा उपक्रम यूएई सरकार आणि रेड क्रिसेंट सोसायटीनं सुरू केला आहे.
 
मोईन यांनी बीबीसी अरबीला सांगितलं, "उमरला त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूबद्दल अशा प्रकारे सांगावं लागेल, की त्याला धक्का बसणार नाही. किंवा तो अशा परिस्थितीत पोहोचू नये, की त्याला मी आवरु शकत नाही."
 
बीबीसी अरबीला पाठवलेल्या अनेक व्हॉईस नोट्सद्वारे मोईन या गोष्टी सांगतात.
ते सांगतात की, उमरला माहिती आहे की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाहिलं नाही आणि तो विचारतो- आई कुठे आहे, आजी कुठे आहे, ते लोक कुठे गेले आहेत?
 
मोईनला उमरसाठी वैद्यकीय मदत मिळण्याची आशा आहे, पण उमरला रुग्णवाहिकेद्वारे इजिप्तच्या सीमेवर नेलं जाईल याची शाश्वती नाही.
 
असं यासाठी, कारण मध्य गाझामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले होत आहेत.
 
इस्रायली लष्करानं गाझाला दोन भागात विभागलं आहे.
 
रणगाडे आणि सैनिक आता दक्षिणेतील शहर खान युनूसकडे जात आहेत.
 
दीर अल-बालाहचा मुख्य महामार्ग युद्धभूमी म्हणून घोषित करण्यात आला. यामुळे इथं अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी फारच कमी मार्ग आहेत.
 
उत्तर गाझामधील परिस्थिती
उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या अनेक पॅलेस्टिनींनी मध्यवर्ती भागात आश्रय घेतला आहे. इस्रायली लष्करानं या लोकांना हा परिसर रिकामा करून दक्षिणेकडे जाण्यास सांगितलं होतं.
 
हा आदेश युद्धाच्या सुरुवातीला आला.
 
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर हे युद्ध सुरू झालं. हमासच्या हल्ल्यात सुमारे 1200 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इथं 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.
 
याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 49 हजार लोकांपैकी चार वर्षांचा ओमरचाही समावेश आहे.
 
इस्रायलचं म्हणणं आहे की, त्यांचं सैन्य हमासच्या कट्टरवाद्यांना लक्ष्य करत आहे. यामध्ये कट्टरवाद्यांच्या ठिकाणांचा समावेश आहे.
 
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 22 हजारांहून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
 
जेव्हा उमरच्या कुटुंबावर हल्ला झाला
मोइन यांनी बीबीसी अरबीला सांगितलं की उमर आणि त्याचं कुटुंब देर अल-बालाहच्या उत्तरेकडील नुसरत कॅम्पमध्ये त्याच्या आजीच्या घरी गेलं होतं.
 
जेव्हा ओमरचं कुटुंब इथं उपस्थित होतं, तेव्हा इस्रायलनं कोणतीही पूर्वसूचना न देता हल्ला केला आणि लोक मारले गेले.
 
मोइन म्हणतात, "आम्ही या प्रकारचं कोणतंही क्षेपणास्त्र कधी पाहिलं नव्हतं. क्षेपणास्त्र पडून संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. सुदैवानं घराचा एक भाग उघडा होता, जिथे उमर खाली पडला. पण त्याच्या डाव्या हाताला एवढी दुखापत झाली होती की, तो ताबडतोब कापावा लागला."
 
ते म्हणतात, "उमरचं शनिवारी तीन युनिट रक्त कमी झालं होतं. त्याचं हिमोग्लोबिनही 7.4 वर आलं. रक्त चढवण्यासाठी उमरवर शस्त्रक्रिया करण्यात आली."
 
मोइन सांगतात की, रुग्णालयातील स्थिती खूप वाईट होती, उमरची प्रकृती एवढी नाजूक झाल्यानंतर त्यांना त्याच्यासाठी बेड मिळू शकला नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या आत एका मोकळ्या जागेत डॉक्टर आणि परिचारिकांनी उमरवर उपचार केले.
 
ते पुढे सांगतात, "उपचारांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू मर्यादित आहेत. हॉस्पिटलमध्ये पेन किलर नाहीत, त्यामुळे वेदनेवरुन लक्ष हटवता यावं म्हणून जोक सांगून लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला जातो."
 
मोइन म्हणाले की, ही पद्धत फक्त काही वेळा उपयोगी पडते, पण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.
 
मोइन यांना आशा आहे की उमरला गुरुवारपर्यंत राफाह सीमेवर नेलं जाईल, तेथून त्याला उपचारासाठी इजिप्तच्या रुग्णालयात नेता येईल.
 
एक वाईट स्वप्न...
इस्रायली बॉम्बहल्ल्यात वाचलेल्यांमध्ये लीना शाकोरा, त्यांचा नवरा आणि तीन मुलांचाही समावेश आहे.
 
त्या सांगतात की, आम्ही अजूनही एक भयानक स्वप्न जगत आहोत.
 
लीना यांनी गाझा शहरातील शेख रादवान येथून पलायन गेल्यानंतर त्या दीर अल-बालाह येथील शेतातील घरात राहत आहेत.
 
लीना बीबीसी अरबीला सांगतात की- आम्ही रोज सकाळी उठतो आणि लक्षात ठेवतो की आम्ही युद्धात आहोत. लोक भुकेने मरत आहेत. तुम्हाला घरातून हाकलून देणं म्हणजे छळ आहे. पोट भरण्यासाठी अन्नही नाही.
 
त्या सांगतात की, "माझं कुटुंब आणि इतर 40 लोक एकाच खोलीत आहेत, स्फोटामुळे खोलीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. एकप्रकारे आपण उघड्यावर बसलो आहोत असे समजा. खूप थंडी आहे आणि लोक चिंतेत आहेत."
 
लीना सांगतात की, त्यांच्या मुलांची पाठ दुखतेय, कारण ते पाण्याचे गॅलन वाहून थकले आहेत. हे पाणी खराब आहे, कारण इंधनाच्या अभावी पाण्याचा प्लांट चालत नाहीय. कुटुंबाला निकृष्ट दर्जाचं अन्न खावं लागत आहे.
 
त्या सांगतात- आमची सर्वांत मोठी अपेक्षा आहे की आम्हाला पीठ मिळावं जेणेकरून आम्ही काहीतरी बनवू शकू, पोट भरू शकू.
 
संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे की ते राफाहच्या बाहेर साहित्य पुरवण्यास असमर्थ आहेत.

Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments