Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'हमासनं इस्रायलच्या डोळ्यात धूळ फेकून एवढा मोठा हल्ला केलाय, आता...'

isrial
, सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (11:04 IST)
जेरेमी बोवेन
हमासने गाझामधून सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाकांक्षी हल्ल्याने इस्रायलला आश्चर्यचकीत केले आहे.
 
जे काही घडत आहे ते अभूतपूर्व आहे. इस्रायलने अलिकडच्या काळात सीमारेषेपलिकडून अनुभवलेला हा सर्वात भीषण हल्ला आहे ज्यामध्ये हमासने अनेक ठिकाणी गाझाला इस्रायलपासून विभक्त करणारे तारेचे कुंपण तोडून टाकले.
 
1973 साली इजिप्त आणि सीरियाने केलेल्या आकस्मिक हल्ल्यानंतर सुरू झालेल्या मध्य पूर्व युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या दुस-या दिवशी हा अभूतपूर्व हल्ला झाला आहे. हमासच्या नेतृत्वासाठी त्या तारखेचे महत्त्व कधीच कमी होणार नाही.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणतात की, त्यांच्या देशाने युद्ध पुकारले आहे आणि शत्रूंना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.
 
मृत इस्रायली नागरिक तसेच सैनिकांचे व्हिडिओ आणि फोटो संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
इतर काही व्हिडिओमध्ये हमासची शस्त्रधारी माणसे ही सैनिक आणि नागरिकांना गाझामध्ये कैदेत नेत असल्याचे पाहून इस्रायली संतप्त आणि चिंताग्रस्त झाले आहेत.
 
काही तासांतच इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले करून अनेक पॅलेस्टिनी मारले. लष्करप्रमुखांकडून पुढील लष्करी कारवाईचे नियोजन करण्यात येत आहे
 
इस्रायली ओलिसांच्या तिथल्या उपस्थितीमुळे मागील घुसखोरीपेक्षा ही कारवाई आता अधिक क्लिष्ट असणार आहे.
 
अनेक महिन्यांपासून हे स्पष्ट दिसून येत होते की पॅलेस्टिनी सशस्त्र गट आणि इस्रायल यांच्यात संघर्ष पेटण्याचा धोका वाढला आहे. हमासच्या सशस्त्र शाखेबाहेर हे कसे आणि कुठे घडले हे आश्चर्यचकीत करणारे होते.
 
इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोक वेस्ट बँक, जेरुसलेम आणि जॉर्डनच्या सीमेदरम्यानच्या प्रदेशावर लक्ष केंद्रित करत आहेत जो इस्रायलने 1967 पासून व्यापला आहे, जिथे वर्षभर जवळजवळ सतत संघर्ष आणि हिंसाचार होत असतो.
 
सशस्त्र पॅलेस्टिनिंनी, विशेषत: जेनिन आणि नॅब्लस या वेस्ट बँक शहरांमधून कार्यरत असलेल्यांनी इस्रायली सैनिक आणि ज्यू स्थायिकांवर हल्ले केले आहेत.
 
इस्रायली सैन्याने डझनभर छापे टाकले आहेत. पॅलेस्टिनी गावांववर बदला घेण्यासाठी सशस्त्र स्थायिकांनी कायदा स्वतःच्या हातात घेतला आहे.
 
इस्रायलच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारमधील कट्टर धार्मिक राष्ट्रवादी लोकांनी व्यापलेला संपूर्ण प्रदेश हा ज्यू भूमी असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे.
 
गाझा बाहेर हमास अशा जटिल आणि नियोजनबद्ध ऑपरेशनचा विचार आणि त्याची काळजीपूर्वक आखणी करेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
 
काय घडणार आहे याचा अंदाज बांधण्यात गुप्तचर यंत्रणांना आलेल्या अपयशाबद्दल इस्रायलमध्ये आधीच दोषारोप सुरू झाले आहेत. गुप्तहेरांचे विस्तृत नेटवर्क, एजंट आणि संशयितांवर पाळत ठेवणारी उच्च तांत्रिक यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडेल, अशी इस्रायलींची अपेक्षा आहे.
 
आठवड्याच्या शेवटी धार्मिक सुट्टीच्या दिवशी इस्रायली आराम किंवा प्रार्थना करत होते तेव्हा सरतेशेवटी, हमासच्या ऑपरेशनने इस्रायली गुप्तचर संघाटनांची झोप उडवली.
 
जेरुसलेमच्या मशिदींना धोका असल्याने हे कृत्य केल्याचे हमासने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात काही ज्यूंनी अक्सा मशिदीच्या आवारात प्रार्थना केली होती, जे सौदी अरेबियातील मक्का आणि मदिनानंतर मुस्लिमांसाठी तिसरे पवित्र स्थान आहे.
 
हे ठिकाण बायबलशी संबंधित ज्यू मंदिराचे असल्याने ज्यूंनीही याच परिसराची पूजा केली होती. धार्मिक ज्यू ज्याला ते मंदिराचा कळस म्हणतात त्यांना कदाचित याविषयी फारसे काही वाटणार नाही, परंतु पॅलेस्टिनी लोक याला अत्यंत चितावणीखोर मानत असल्याने इस्रायलने ते प्रतिबंधित केले आहे.
 
तरीही, जेरूसलेमचा इतिहास पाहता, तो नेहमीच राष्ट्रीय आणि धार्मिक संघर्षाचा भडका उडवणारा होता, जो अपवादात्मकपणे शांततापूर्ण होता.
 
हमासच्या ऑपरेशनची गुंतागुंत दर्शवते की याचे नियोजन अनेक महिन्यांपासून केले जात होते. गेल्या आठवडाभरात जेरुसलेममध्ये घडलेल्या घटनांना ही घाईघाईने दिलेली प्रतिक्रिया नाही.
 
हमास आणि इस्रायलमध्ये पुन्हा एकदा युद्ध होण्याची कारणे खूप खोलवर रूतलेली आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या मथळयांमध्ये कुठेही येत नसले नसले तरी इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष तापत चालला होता.
 
असे असले तरी, इस्रायलच्या बरोबरीने स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी लघुलेख, द्वि-राज्य समाधानाद्वारे अधिकृतपणे शांततेचे आवाहन करणार्‍या देशांनी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. काही काळासाठी, 1990 च्या ओस्लो शांतता प्रक्रियेदरम्यान, दोन राज्यांची निर्मिती ही एकमेव आशा होती. आता ती पोकळ घोषणा आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने पॅलेस्टिनी-इस्रायली संघर्षाला प्राधान्य दिले नाही. इस्रायलशी संबंध ठेवण्याच्या बदल्यात सौदी अरेबियाला सुरक्षेची हमी देण्याचा मार्ग शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
 
दशकभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा अमेरिकेचा शेवटचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
 
या समस्येच्या केंद्रस्थानी भूमध्य समुद्र आणि जॉर्डन नदीच्या दरम्यान असलेल्या जमिनीवरील नियंत्रणासाठी अरब आणि ज्यू यांच्यातील गुंतागुंतीचा आणि शतकानुशतके तोडगा निघू न शकलेला संघर्ष आहे.
 
या झपाट्याने वाढणाऱ्या घटनांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की संघर्षावर केवळ तात्पुरता तोडगा काढून चालत नाही. जेव्हा ते चिघळण्यासाठी सोडले जातात, तेव्हा हिंसा आणि रक्तपातही ठरलेला असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nainital School Bus Accident: बस कोसळून 7 जणांचा मृत्यू!