Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रकचा मोठा अपघात; 49 जण जागीच ठार, 58 जण जखमी

Webdunia
शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (12:50 IST)
दक्षिण मेक्सिकोत ट्रक उलटून 49 जणांचा मृत्यू झाला असून 58 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानं या अपघाताबद्दल ही माहिती दिली आहे. चियापासजवळील ब्रिजजवळ ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी जवळपास 100 स्थलांतरित लोक ट्रकमध्ये होते. हे लोक मध्य अमेरिकेतील होते.
 
या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पसरले होते. अपघातातील दुखापत झालेल्या जवळपास 58 जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती चियापस सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीचे लुईस मॅन्यएल ग्रासिया यांनी दिली.
 
त्यांच्या माहितीनुसार, या अपघतात प्रौढ स्त्री-पुरुषांसह लहान मुलंही होती. या ट्रकमधील लोक होंडुरासमधील स्थलांतिरत होते. स्थलांतरितांना वाहून नेणारा हा ट्रक वळणावर घसरला आणि चियापास राज्याची राजधानी टक्स्टला गुटेरेझकडे जाणाऱ्या रस्त्यारील फूटपाथवर जाऊन धडकला.
 
कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांचं सर्वात मोठं ट्रान्झिट पॉईंट म्हणून चियापासची ओळख आहे. मध्य अमेरिकेतील गरिबी आणि हिंसेला कंटाळून शेकडो लोक दरवर्षी मेक्सिकोमार्गे स्थलांतर करत अमेरिकेत पोहोचतात. अनेकजण स्मगलर्सना पैसे देऊन स्थलांतर करतात. मात्र, एकाच वाहनात अनेकांना कोंबून असे वाहून नेले जाते, जे अत्यंत धोकादायक ठरतं.
 
मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेझ मॅन्युएल लोपेझ ओब्रॅडर यांनी या दुर्घटनेबाबत म्हटलं की, अत्यंत वेदनादायी घटना आहे. तसंच, या घटनेबद्दल अत्यंत वाईट वाटतंय, असंही त्यांनी ट्विटरवर लिहिलंय.
 
चियापासचे गव्हर्नर रॅटिलियो एस्कॅंडन यांनी पीडितांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आणि अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मृतांची ओळख अद्याप पूर्णपणे पटलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मनू भाकरला खेलरत्न मिळू शकतो,अंतिम यादी निश्चित झालेली नाही- क्रीडा मंत्रालय

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

दाऊद इब्राहिमच्या भावावर मोठी कारवाई, ईडीने मुंबईतील फ्लॅट ताब्यात घेतला

जयपूर टँकर अपघातात जखमी दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 15 वर पोहोचली

LIVE: एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना भाजपने फसवले! शिवसेना संतप्त

पुढील लेख
Show comments