Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

24 मार्च रोजी राष्ट्रीय शोक दिवस जाहीर, रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले

Webdunia
रविवार, 24 मार्च 2024 (11:21 IST)
रशियातील क्रोकस शहरात झालेल्या गोळीबारात 140 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 मार्च रोजी राष्ट्रीय शोक जाहीर केला. पुतिन म्हणाले की, या हत्याकांडातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तपासाअंती या हत्येतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले.रशियातील हल्ल्याबाबत रशियन सुरक्षा एजन्सीनुसार, हल्लेखोरांचे युक्रेनमध्ये संपर्क होते आणि ते सीमेच्या दिशेने पळत होते. मात्र, रशिया-युक्रेन सीमेवर पोहोचण्यापूर्वीच त्याला ब्रायन्स्क प्रांतात पकडण्यात आले.
 
मॉस्को गोळीबारावर निराशा आणि दु:ख व्यक्त करत, नुकतेच पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले पुतीन देशवासीयांना उद्देशून म्हणाले, 'आज मी त्या रक्तरंजित कृत्याबद्दल तुमच्याशी बोलत आहेत, ज्यामध्ये डझनभर निरपराध, शांतताप्रिय लोक बळी पडले. मी 24 मार्च हा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित करतो.
 
दहशतवाद्यांनी हॉलमध्ये बॉम्बस्फोट केला आणि क्रोकस शहरातील निरपराध लोकांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. या घटनेनंतर रशियन सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांनी संयुक्तपणे मॉस्कोमध्ये हाय अलर्ट जारी करून मोहीम सुरू केली. या घटनेत आतापर्यंत 11 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यातील चार बंदूकधारी आहेत ज्यांचा थेट हल्ल्यात सहभाग होता.

दहशतवादी हल्ल्यानंतर रशियन एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) ने याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले. त्याचवेळी रशियाच्या या आरोपांवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागाराने या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. या घटनेबाबत रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव म्हणाले की, रशियावर आयएस-खोरासानचा हा हल्ला देशासाठी एक नवीन आणि गंभीर धोका दर्शवतो. हा हल्ला कोणीही केला असेल त्याला सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.
 
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments