Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनकडून मसूद अजहरसाठी व्हेटो अधिकार वापर

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (17:03 IST)

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यावर  चीनने  खोडा घातला आहे.  अमेरिका आणि फ्रान्सने मसूद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मात्र चीनने प्रतिबंध करण्याचा (व्हेटो) अधिकार वापरत मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या निर्णयावर ३ महिन्यांसाठी तांत्रिक स्थगिती आणली आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात चीनने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र समितीत विरोध केला होता. 

चीनने मसूद अजहरविरोधातील प्रस्तावाला केलेल्या तांत्रिक विरोधाची २ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. तांत्रिक स्थगिती संपण्याआधीच चीनने पुन्हा एकदा प्रस्तावावर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती 2 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. चीनच्या या निर्णयामुळे अजहरला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास अडथळे येत आहेत.  

भारताने मसूद अजहरची संयुक्त राष्ट्राच्या कलम १२६७ अंतर्गत नोंद करण्याची मागणी केली होती.  ज्‍यामुळे त्याच्या स्वतंत्रपणे फिरण्यावर तसेच दौऱ्यावर बंदी घालण्यात येईल. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments