Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमानात जन्मलं 'मिरॅकल' बाळ, डॉक्टरांनी विमानप्रवासात केली महिलेची प्रसुती

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (20:24 IST)
युगांडाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका गर्भवती महिलेची डिलीव्हरी झाली आणि एक तान्हुली सुरक्षितपणे या जगात आली. विमानतच ही डिलीव्हरी करणाऱ्या कॅनडाच्या डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला.
डॉक्टर आयेशा खातीब टोरंटो विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. कतार एअरवेजच्या दोहा ते एंटेब फ्लाईटमध्ये प्रवास करत असताना विमानात एक घोषणा करण्यात आली.
युगांडामधील एक स्थलांतरीत गर्भवती कामगार सौदी अरेबियाहून घराच्यादिशेने प्रवास करत असताना त्यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. ते त्यांचं पहिलं बाळंतपण होतं.
हे बाळ अवघं 35 आठवड्यांचं होतं. मात्र तरीही जन्मामंतर ते सुदृढ होतं. या बाळाचं नाव डॉक्टरांच्या नावावरून 'मिरॅकल आयेशा' असं ठेवण्यात आलंय.
टोरंटोमधल्या कोरोनाच्या अत्यंत थकवून टाकणाऱ्या कामाच्या दगदगीनंतर डॉक्टर खातीब या त्यांच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि विश्रांतीसाठी निघाल्या होत्या.
मात्र, जेव्हा इंटरकॉमवर विमानात एखादा डॉक्टर आहे का? अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी जराही मागं-पुढं पाहिलं नाही.
"मला पेशंटच्या भोवती लोकांची गर्दी गोळा झालेली दिसत होती," असं डॉक्टर खातीब बीबीसी बरोबर बोलताना म्हणाल्या. हार्ट अटॅकसारखी एखादी आणीबाणीची परिस्थिती असेल असं त्यांना वाटलं होतं.
"मी जवळ जाऊन पाहिलं तर सीटवर एक महिला झोपलेली होती. तिचं डोकं आतल्या बाजूला आणि पाय खिडकीकडे होते. त्यावेळी बाळ बाहेर येऊ लागलं होतं!"
डॉ. खातीब यांना विमानातील इतर दोन प्रवाशांनी मदत केली. त्यापैकी एक परिचारिका आणि एक डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स संस्थेचे बालरोगतज्ज्ञ होते.
बाळ जोरानं रडत होतं, असं त्या म्हणाल्या. बाळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांनी आणखी सखोल तपासणीसाठी ते बाळ बालरोगतज्ज्ञांकडे पाठवलं.
"मी बाळाकडं पाहिलं ती अगदी स्वस्थ होती. तसंच मी आईकडं पाहिलं तर तीही ठीक होती,"असं डॉ. खातीब म्हणाल्या.
"त्यामुळं मी लगेचच अभिनंदन मुलगी झाली असं म्हटलं. त्यानंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मला अचानक लक्षात आलं की, आपण विमानात आहोत आणि सगळे आपल्याकडे पाहत आहेत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी झाली, अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त,गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास शिंदे यांच्याकडे आले

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी झाली, अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त, गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास शिंदे यांच्याकडे आले

पंजाबमधील मोहालीमध्ये तळघर खोदकाम सुरू असताना इमारत कोसळली

मंदिराच्या दानपेटीत भक्ताचा आयफोन पडला, मागितल्यावर परत करण्यास नकार जाणून घ्या प्रकरण

ॲमेझॉन अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दाखल होणार

पुढील लेख
Show comments