Festival Posters

जगापुढे शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान : मोदी

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:22 IST)
दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाली. 1997च्या तुलनेत भारताचा जीडीपीही सहापटीने वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारताने नेहमी वसुधैव कुटुंबकमवर विश्र्वास ठेवला आहे. याचा अर्थ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, असे त्यांनी म्हटले.
 
भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा हे 1997 मध्ये दावोसला आले होते. तेव्हा भारताचा जीडीपी हा सुमारे 4 मिलियन डॉलरच्या आसपास होता. दोन दशकानंतर तो आता सुमारे सहापट अधिक आहे. आता आपण नेटवर्क सोसायटी नाही. तर बिग डेटाच्या विश्वात वावरत आहोत. 1997 मध्ये युरो चलन नव्हते. त्यावेळी ब्रेक्झिटची चिन्हेही नव्हती. त्यावेळी खूप कमी लोकांनी ओसामा बिन लादेनचे नाव आणि हॅरी पॉटरचे नाव ऐकले होते. त्यावेळी बुद्धिबळ खेळणार्‍या खेळाडूंना कॉम्प्युटरबरोबर पराभूत होण्याचा धोका नव्हता. त्यावेळी गुगलचा शोधही लागला नव्हता. त्यावेळी जर तुम्ही अ‍ॅमेझॉनचे नाव इंटरनेटवर शोधले असते तर तुम्हाला नदी किंवा पक्षचे नाव सापडले असते. ट्विट करण्याचे का पक्षीच करत असत. 
 
दावोस त्यावेळी इतर सर्वांपेक्षाही पुढे होते आणि आजही आहे. आज आपल्याकडे डेटा खूप आहे. डेटाचा पर्वत बनत आहे. त्यावर नियंत्रणाची स्पर्धा लागली आहे. आता म्हटले जाते की, जो डेटावर नियंत्रण ठेवेल तोच जगात आपले वर्चस्व कायम राखेल. आज वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणारे आव्हान अधिक गंभीर होताना दिसत आहे.
 
यावेळी त्यांनी लोकशाहीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही भारतीय आपल्या लोकशाही आणि विविधतेवर अभिमान बाळगतो. धार्मिक, सांस्कृतिक, विविध भाषा आणि विविध प्रकारच्या समाजासाठी लोकशाही केवळ एक राजकीय व्यवस्था नाही तर एक जीवनशैली असल्याचे ते म्हणाले. 70 वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात एकीकृत कर व्यवस्था लागू करण्यात आली. पारदर्शकता आणि जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राला दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या मिळाल्या, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील पर्यटनाला चालना मिळणार

पैठणमध्ये व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट करून दोन मित्रांनी आपले जीवन संपवले

LIVE: महाराष्ट्राला दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या मिळाल्या

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Kali the Brave Dog: निरागस 'काली'ने एकटीने एका विषारी सापाशी झुंज देत ३० मुलांचे प्राण वाचवले

पुढील लेख
Show comments