Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

सिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात

navjyot singh siddhu
, शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (14:56 IST)
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी  गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. याशिवाय, शपथविधी सुरु असताना सिद्धू पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या शेजारच्या आसनावर बसले होते. 
 
यावरुन सिद्धू यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. एक व्यक्ती आणि मंत्री म्हणून सिद्धू्ंचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. याविषयी आता केवळ तेच स्पष्टीकरण देऊ शकतात. सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत