Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानला मोठा झटका, टाकले 'ग्रे लिस्ट' मध्ये

Webdunia
शुक्रवार, 29 जून 2018 (09:01 IST)
फायनॅंशियल अॅक्शन टास्क फोर्सने दहशतवाद्यांना फंडिंगवर रोख लावण्यात अयशस्वी ठरल्याने पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकलं आहे. स्वत:च्या बचावासाठी FATFला पाकिस्तानने 26 सूत्री अॅक्शन प्लान पाठवला होता. पण पाकिस्तान पुन्हा एकदा ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचला आहे. बुधवार रात्री पॅरिसमध्ये FATFच्या प्लॅनरी सेशनमध्ये हा निर्णय घेण्यात आला. जेथे पाकिस्तानचं प्रतिनिधित्व पाकिस्तानचे अर्थमंत्री शमशाद अख्तरने केलं. FATF पॅरिसमधील सरकारी संस्था आहे. या संस्थेचं काम बेकायदेशीर आर्थिक मदत करणाऱ्यांबाबतीत नियम बनवण्याचं आहे. 
 
1989 मध्ये याची स्थापना झाली. FATF ने ग्रे किंवा ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यास त्या देशाला आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज मिळणं कठीण होऊन जातं. ही घोषणा पाकिस्तानकडून 26 सूत्री अॅक्शन प्लान सोपवल्यानंतर करण्यात आली. या प्लाननुसार पाकिस्तानने मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या जेयूडीसह इतर दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक फंडींग रोखण्यासाठी मंजूरी दिली होती. कारण त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येऊ नये. ग्रे लिस्टमध्ये गेल्यानंतर ही पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments