Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या २९ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौऱ्यावर

Webdunia
गुरूवार, 18 मे 2017 (16:59 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी  २९ मेपासून तीन देशांचा दौरा करणार आहेत.  या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, स्पेन आणि रशियाला भेट देणार आहेत. मोदी तीन देशांच्या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीच्या दौऱ्यादरम्यान चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेणार आहेत. उभय देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मोदी मर्केल यांची भेट घेणार आहेत. उभय देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान मोदी जर्मनी आणि स्पेनला भेट देणार आहेत. तर रशियात पंतप्रधान मोदी सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरममध्ये (एसपीआयईएफ) सहभागी होणार आहेत. १ ते ३ जून या कालावधीत या फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. एसपीआयईएफमध्ये जगभरातील कंपन्या, उद्योगपती यांचा सहभाग असतो. त्यामुळे या कार्यक्रमातून भारतात अधिक परकीय गुंतवणूक आणण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न असणार आहे. एसपीआयईएफमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील. द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी पुतीन यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि अणुउर्जा क्षेत्रातील सहकार्य हे मोदी-पुतीन यांच्या भेटीतील चर्चेचे मुख्य मुद्दे असणार आहेत.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments