Marathi Biodata Maker

श्रीलंकेत दहा दिवसांची आणीबाणी जाहीर

Webdunia
मंगळवार, 6 मार्च 2018 (17:18 IST)

मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत दहा दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये त्यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील कँडी भागात धार्मिक दंगल उसळली. त्यानंतर हिंसा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करणे हाच आणीबाणी लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष आणि वाद सुरु आहे. बौद्ध धर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप बौद्ध धर्मीयांनी केला आहे. तसेच बौद्ध धर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्धवस्त केली जात असल्याचाही आरोप होतो आहे. हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments