Festival Posters

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:11 IST)
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनालिस या संस्थेने दिला आहे. या तिमाहीमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४.०४ कोटी इतकी होती. तर पहिल्या स्थानावर १०.०६ कोटींच्या स्मार्टफोनसह चीन पहिल्या स्थानावर आहे. याच कालावधीत अमेरिकी बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४ कोटी होती, त्यामुळे या कालावधीत झालेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, स्मार्टफोन्सच्या खरेदीच्या बाबतीत चिनी बाजारपेठ भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
 
जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोन्सची विक्री ७.२ टक्क्यांनी घटून ३४.८९ कोटी इतकी झाली आहे. गेले चार महिने स्मार्टफोन्सच्या विक्रीत सातत्यानं घट होत आहे, असे कॅनालिसनं आपल्या अहवालात नमूद केले आहे.
 
ज्या तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे त्यामध्ये इंडोनेशिया (१३.२ टक्के वाढीसह ८९ लाख), रशिया (११.५ टक्के वाढीसह ८८ लाख) व जर्मनी (२.४ टक्के वाढीसह ५५ लाख) यांचा समावेश आहे. पहिल्या स्थानी असलेल्या चिनी बाजारपेठेतील मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत १५.२ टक्क्यांनी घटली तर भारतातली मागणी १.१ टक्क्यानं घटली आहे.
 
स्मार्टफोन उत्पादकांमध्ये सॅमसंग २०.४ टक्के बाजारातील हिश्शासह आघाडीवर आहे. त्यामागोमाग हुआवेई (१४.९ टक्के), अपल (१३.४ टक्के), शाओमी (९.६ टक्के) व ओप्पो (८.९ टक्के) या कंपन्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

ट्यूशन शिक्षिकाने प्रियकारासोबत अल्पवयीन विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केली, दोषींना जन्मठेपेची शिक्षा

LIVE: मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दंड ठोठावला

अमेरिकेतील फेडरल एजंट्सनी एका ५ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतल्याने खळबळ, कमला हॅरिसची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी आज दक्षिण भारतासाठी चार नवीन गाड्यांचे उद्घाटन करणार, तामिळनाडूमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजणार

इंडिगो विमान पुण्यात उतरत असताना धमकीची चिठ्ठी सापडली; प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले

पुढील लेख
Show comments