Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संचार उपग्रह जीसॅट १७ चे यशस्वी प्रक्षेपण

Webdunia

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गुरुवारी अंतराळ मोहीमेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७ चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘एरियन- ५’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हे अंतराळात झेपावले.  जीसॅट १७ या उपग्रहाचे बुधवारी दुपारी प्रक्षेपण होणार होते. मात्र खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी गुरुवारी हवामान प्रक्षेपणासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाल्यावर जीसॅट-१७ उपग्रह अंतराळात झेपावले. जीसॅट १७ हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. याशिवाय हवामानाविषयीची माहिती आणि शोधमोहीम आणि मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. यासाठी उपग्रहामध्ये उपकरणेही लावण्यात आली आहे.  फ्रेंच प्रक्षेपक एरियन-५ वीए २३८ च्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments