Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यूज अँकरने 'असा' केला बलात्काराचा निषेध

Webdunia
शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (09:03 IST)

पाकिस्तानमध्ये एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक मातांनी धास्ती घेतलेय. या घटनेनंतर एका वृत्तनिवेदिकेने आपल्या चिमुकलीला स्डुडिओत नेत बातमीपत्र वाचले.  या वृत्तनिवेदिकाचा बातमीपत्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून  तिची हत्या करण्यात आली.  या घटनेनंतर तिथे हिंसक आंदोलन सुरु आहे. 

एका न्यूज चॅनेलच्या टीव्ही अँकरने या बलात्काराच्या घटनेचा वेगळ्या प्रकारे निषेध केला आणि समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. तिने आपल्या मुलीला सोबत घेत लहान मुलीवरील बलात्कार आणि हत्येची बातमी वाचली.  किरण नाज या समा न्यूज चॅनेलच्या अँकर आहेत. किरण या बातमी वाचताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या. मी किरण नाज नाही तर एक आई आहे, असं म्हणत त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments