Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेचा आयएसवर सर्वात मोठा हल्ला, काय म्हणाले ट्रंप...

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (11:04 IST)
अमेरिकी सेनेने गुरुवारी  अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला आहे. हल्ल्यानंतर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले की त्यांनी अफगाणिस्तात बॉम्बहल्लाची परवानगी दिली होती आणि त्यांनी या मोहिमेला यशस्वी प्रकारे पार पाडले. पेंटागॉनचे प्रवक्ते एडम स्टम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
पाकिस्तानच्या सीमेजवळ ननगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात इसिसचे बोगदे आणि बंकर असलेल्या परिसरात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला. अफगाणिस्तानमधून इसिसचा पूर्ण सफाया करेपर्यंत अमेरिका सैन्य कारवाई करीत राहणार असल्याचेही अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 
‘मदर आॅफ आॅल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा तर बसलाच, शिवाय अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले. ज्या भागात ‘जीबीयू ४३ बी मॅसिव्ह आॅर्डिनेन्स एअर ब्लास्ट’ बॉम्ब टाकण्यात आला तो इसिसचा प्रभाव असलेला परिसर आहे. या हल्ल्याने किती हानी झाली ते स्पष्ट होऊ शकले नाही.  

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments