Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपर्यंत दारुला स्पर्श केला नाही – डोनाल्ड ट्रम्प

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (12:00 IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण दारुच्या थेंबालाही हात लावत नसल्याचे सांगितले आहे. अकाली मृत्यू आलेल्या आपल्या मोठ्या भावाचा किस्सा सांगता-सांगता ट्रम्प भावुक झाले.
 
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प यांचा 1981 मध्ये मृत्यू झाला होता. दारुच्या आहारी गेल्यामुळे वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान ट्रम्प यांनी भावाची आठवण सांगितली. आपण आपल्या भावाला हळूहळू दारुच्या गर्तेत जाताना पाहिल्याचं ते म्हणाले. भावाच्या अनुभवातूनच मी शिकत गेल्याचे ट्रम्प म्हणाले.
मला एक भाऊ होता. फ्रेड. उत्तम मुलगा. देखणा मुलगा. लोभस व्यक्तिमत्त्व. माझ्यापेक्षा खूपच चांगला. पण त्याची एक समस्या होती. तो मद्याच्या आहारी गेला होता. तो मला सांगायचा, मद्यपान करु नकोस. तो माझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे मी त्याचा आदर करायचो. त्याचं म्हणणं ऐकायचो. तो सतत मला सांगायचा. पिऊ नकोस. धूम्रपानही करु नकोस, असे ट्रम्प म्हणाले.
 
आजतागायत मी कधीच अल्कोहोल घेतलेली नाही. मला इच्छाही नाही. मी कधी सिगरेटही हातात धरली नाही. सुदैवाने मला मार्गदर्शक होता. माझं ऐका, मद्यपानामुळे त्याचे आयुष्य खूप म्हणजे खूप यातनादायी गेले, असे ट्रम्प म्हणाले. तो खूप खंबीर होता, पण तो ज्या परिस्थितीतून गेला, ती कठीण होती. मी फ्रेडकडून खूप काही शिकलो, असे सांगताना ट्रम्प यांना भावना अनावर झाल्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments