Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

US School Shooting: हल्लेखोराने शाळेत गोळीबार केला, सात ठार

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (08:56 IST)
अमेरिकेत पुन्हा एकदा सामूहिक गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी हल्लेखोराने एका शाळेत गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. घटना नॅशविले ख्रिश्चन स्कूलची आहे. या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर तरुणी असल्याचे सांगण्यात येत आहे. संशयिताने बाजूच्या दरवाजाच्या प्रवेशद्वारातून इमारतीत प्रवेश केला. पोलिसांनी त्याला दुसऱ्या मजल्यावर घेरले. महिला शूटरला मारली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, टेनेसीच्या नॅशविले येथील एका शाळेत सोमवारी हल्लेखोराने गोळीबार केला. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच अनेक जण गोळ्यांच्या तडाख्यात आले. अनेक जण ठार किंवा जखमी झाले .जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यात बळी पडलेल्या शाळेचे नाव कॉव्हेंट स्कूल असे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाळेत प्लेग्रुपपासून सहाव्या वर्गापर्यंत सुमारे 200 विद्यार्थी होते. हल्ल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आपला जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या चर्चकडे धाव घेतली.घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments