Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानमध्ये रविवारी काय काय घडलं?

Webdunia
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (11:24 IST)
रविवारी काबूलजवळच्या जलालाबाद शहरावर कब्जा केल्यानंतर तालिबानसाठी लढणारे सैनिक काबूलच्या वेशीवर पोहोचले.
 
शांततामय पद्धतीने सत्तेचं हस्तांतरण व्हावं यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचं तालिबानने सांगितलं. बातचीत सुरू असेपर्यंत आमचे सैनिक काबूल शहरात प्रवेश करणार नाहीत असं तालिबानने स्पष्ट केलं होतं. यादरम्यान काबुलमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं ट्वीट राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी केलं.
 
अफगाणिस्तानमधली वेगाने बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊन, अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी 5,000अतिरिक्त सैनिक पाठवले. त्याचवेळी दूतावासातील तसंच अन्य कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानमधून बाहेर पडता यावं यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले.
 
अफगाणिस्तानमधील महिला खासदार फरजाना कोचाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, लोक काबूल सोडून दुसरीकडे जाऊ इच्छित आहेत. परंतु पळून जायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. तालिबानचं नियंत्रण असलेल्या भागांमध्ये महिलांच्या काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
तालिबानने बामियान प्रांतावरही कब्जा केला. 20 वर्षांपूर्वी तालिबानने याच भागातील बुद्धमूर्तीची तोडफोड केली होती.
 
अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोलो न्यूजला सांगितलं की सत्तेचं हस्तांतरण शांततामय मार्गाने होईल. काबूलवर हल्ला होणार नाही.
 
तालिबानने काबूल शहराच्या बाहेरच्या भागातील बगराम एअरफिल्ड आणि तुरुंगाला ताब्यात घेतल्याचा दावा केला. याच एअरफिल्डवरून अमेरिकेने अफगाणिस्तानात वीस वर्ष नियंत्रण केलं होतं.
 
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी उशिरा राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह यांनी देश सोडल्याचं वृत्त आलं. दुसरीकडे आमचे सैनिक काबूल शहरात दाखल होत असून कार्यालयांवर कब्जा करत आहेत असं तालिबानने सांगितलं. तालिबानच्या कब्जात आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष गनी यांनी देश सोडल्याचं समजल्यानंतर अनेक ठिकाणी गोळीबार ऐकायला मिळाला.
 
अमेरिकेने आपला दूतावास काबूल विमानतळावर स्थलांतरित केला आहे असं परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी सांगितलं.
काही वेळातच राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्याचं तालिबानने स्पष्ट केलं. अल जजीराने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत राष्ट्रपती भवनात तालिबानचे सैनिक दिसून येत आहेत. काबूलनजीकच्या 11 जिल्ह्यांमध्येही नियंत्रण मिळवल्याचं तालिबानने म्हटलं आहे.
 
काबूल विमानतळावरून सर्व प्रकारची कमर्शियल उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. या विमानतळावरून केवळ लष्कराच्या विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.
 
काबूलमध्येच राहणार असल्याचं अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी म्हटलं आहे. दरम्यान देशात रक्तपात होऊ नये यासाठी देश सोडल्याचं राष्ट्राध्यक्ष गनी यांनी सोशल मीडियावर सांगितलं.
 
अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेसाठी बायडन यांनी राजीनामा द्यावा असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
 
तालिबानकडून युद्ध समाप्तीची घोषणा
सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी अल जजिराला म्हटले आहे की अफगाणिस्तानमध्ये युद्ध समाप्ती झाली आहे.
 
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडले आहे.
 
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी म्हटले आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत.
नईम यांनी सांगितले आहे की तालिबानकडून शरिया कायद्यानुसार महिलांचे हक्क आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जाईल.
 
तालिबान कोणच्याही अंतर्गत व्यवहारांकडे लक्ष देणार नाही पण त्याच बरोबर अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये देखील कुणी हस्तक्षेप करू नये.
 
गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांना यश आले आहे असे नईम म्हणाले. आम्हाला आमच्या देशाचे आणि येथील लोकांचे स्वातंत्र्य हवे आहे.
 
कुणाला लक्ष्य करण्यासाठी आम्ही आमच्या जमिनीचा वापर होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

पुढील लेख
Show comments