rashifal-2026

माणसासारखे दात असणारा हा मासा कुठे सापडला?

Webdunia
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (23:30 IST)
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये दातांची रचना माणसासारखी असलेला एक मासा आढळून आला आहे.
 
या माशाचा फोटो आता सर्वत्र व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे.
 
गेल्या आठवड्यात या माशाचा फोटो फेसबुकवर सर्वप्रथम शेअर करण्यात आला. नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका नाग्स नामक मासेमारीच्या ठिकाणी हा मासा आढळून आला होता. या माशाचे दात पाहून लोक अत्यंत आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं.
 
एका युझरने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या माशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
 
या माशाला शिपहेड फिश म्हणून नाव देण्यात आलं आहे. मेंढीच्या दातांची रचनाही काहीशी अशाच प्रकारची असते. या दातांच्या साहाय्याने मेंढी आपलं अन्न खाते. त्यामुळेच माशाला वरील नाव देण्यात आलं आहे. शिवाय या माशाचं तोंड काहीसं मेंढीप्रमाणेच आहे.
 
नॅशन मार्टिन या हौशी मच्छिमाराने या माशाला आपल्या जाळ्यात पकडलं होतं.
 
या माशाला पकडल्यानंतर आपण एखादं मेंढीचं पिल्लू पकडल्याप्रमाणे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया मार्टिन यांनी यावेळी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments