पाकिस्तानी नागरिकांकडून आपल्या देशाला मोठा धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवून कॅनेडियन सरकारने दोन पाकिस्तानी नागरिकांना विमानात बसवून पाकिस्तानला पाठविले आहे.
दहशतवाद्यांशी कथित संबंध असलेल्या या दोन नागरिकांची कॅनडाने पाकिस्तानात हकालपट्टी केली आहे. या दोघांना येथे वास्तव्यासाठी देण्यात आलेला व्हिसा रद्द करून त्यांना अक्षरश: इस्लामाबादला जाणार्या विमानात कोंबण्यात आले, असे कॅनडाच्या ‘नॅशनल पोस्ट’ या दैनिकाने म्हटले आहे.