Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिप्सचा मोह आवरता येत नाही

Webdunia
मंगळवार, 22 जुलै 2014 (11:41 IST)
आरोग्यदायी आणि पोषक पदार्थाचे आहारातील महत्त्व मला कळते मात्र तरीही चिप्स आणि कांदा घालून केलेले मसालेदार पदार्थ समोर आले की मी ते खाण्याचा मोह आवरू शकत नाही अशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुलांसाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीच्या वेळी दिली. व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी असे किडस् डिनर आयोजित केले जाते.
 
हेल्दी लंचटाईम चॅलेंज नावाची एक स्पर्धा अमेरिकेत आयोजित केली जाते. आरोग्यपूर्ण आणि सकस जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा होते. यंदा या स्पर्धेत विजयी ठरलेल्या 54 मुलांना व्हाईट हाऊसमधील किडस् डिनरला आमंत्रित करण्यात आले होते. 
 
त्यावेळी बोलताना ओबामांनी त्यांना चिप्स आवडतात तर फर्स्ट लेडी मिशेल ओबामा फ्रेंच फ्राईजच्या दिवान्या असल्याचेही सांगितले. ओबामा कन्या मालिया आणि साशा आईस्क्रीम, सुशी आणि पाय पसंत करतात अशीही माहिती ओबामांनी या मुलांना दिली. 
 
मात्र आपल्या आवडी सांगताना त्यांनी मुलांनी खाण्याच्या चांगल्या सवयी लागण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवा असा सल्लाही दिला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments