Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वीच्या स्वर्गावर आत्महत्येचा धंधा : स्विटझरलँडमध्ये वाढत आहे 'सूसाइड टूरिझम'

Webdunia
शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (14:09 IST)
पर्यटकांना जर विचारले की पृथ्वीर स्वर्ग कुठे आहे तर ते आहे, स्विटझरलँड. पण आता येथे आत्महत्या करणार्‍यांची (सूसाइड टूरिझम) संख्या मागील चार वर्षांमध्ये दुप्पट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्विटझरलँडमध्ये 'मृत्यूचा अधिकार' यासाठी चार संगठने काम करीत आहे, ज्यामध्ये दोन संगठना परदेशीयांना आत्महत्या करण्यास मदत करण्यासाठी आपली सेवा देतात, ज्याला सूसाइड टूरिझमची संज्ञा देण्यात आली आहे.  
 
निष्कर्षात हे लक्षात आले आहे की येथे आत्महत्या करणारे जास्त लोकं जर्मनी आणि ब्रिटनचे आहे. मेंदूचे गंभीर आजार जसे पर्किंसन आणि मल्टीपल स्कलेरोसिसहून पीडित असलेले लोक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. मृत्यूसाठी जास्तकरून 'सोडियम पेंटोबार्बिटल'चा वापर केला जातो.  
 
झुरिक युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ एक्सिलेंस फॉर मेडिसिन, एथिक्स ऍड लॉचे शोधकर्ता ज्यूलियन माउसबैक यांनी म्हटले, "स्विटझरलँडमध्ये आत्महत्या करणारे सहायक संगठनांमुळे कदाचित येथे आत्महत्या करणार्‍यांची वाढ झाली आहे. ''शोधामध्ये ही बाब समोर आली आहे की वर्ष 2008-12च्या मध्ये 611 परदेशीयांनी येथे सहायकांच्या मदतीने आत्महत्या केली आहे.  
 
आत्महत्या करणार्‍या पर्यटकांचे वय 23-97 वयोगटाचे होते. पण औसत वय 69 वर्ष होते त्यात निम्मे पर्यटक (58.5 टक्के) महिला होत्या.  
 
अध्ययनात ही बाब समोर आली आहे की स्विटझरलँडची सर्वात मोठी सुसाइड टूरिझम कंपनी 'डिग्निटास' आत्महत्याच्या सर्वच प्रकरणात सामील होती. शोधकर्तांनी झुरिकमध्ये आढळले की 2008मध्ये सुसाइड टूरिझमअंतर्गत आत्महत्या करणार्‍या लोकांची संख्या 123 होती, जी 2012मध्ये वाढून 172 झाली.
 
महत्त्वाचे म्हणजे की स्विटझरलँडमध्ये सहायकांच्या मदतीने आत्महत्येची परवानगी आहे, जोपर्यंत स्वार्थवश यासाठी प्रेरित न करण्यात येत असेल. माउसमॅक म्हणतात, "हे काम जगात फक्त स्विटझरलँडमध्ये होत, कारण इतर देशांमध्ये असं करण्याची परवानगी नाही आहे.''  हे अध्ययन पत्रिका 'मेडिकल एथिक्स'मध्ये प्रकाशित झाले आहे. 
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments